Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage Survey : पीक नुकसान पंचनामे म्हणजे मॅच फिक्सिंग

Anil Jadhao 

Pune News : नोव्हेंबर महिन्यात पाऊस आणि गारपीटीने पिकांचे मोठे नुकसान झाले. पण पीक नुकसानीच्या पंचनाम्यात कमी क्षेत्राची नोंद केली जात आहे. तसेच एकाच मंडळात एकापेक्षा जास्त पिकांचे नुकसानग्रस्त क्षेत्र जास्त येणार नाही,

याचीही काळजी पंचनामे करताना घेतली जात आहे. त्यामुळे कमीत कमी नुकसान भरपाई देऊन सरकार फक्त भरपाई देण्याचं नाटक करते आहे. ही निव्वळ मॅच फिक्सिंग आहे, असा आरोप शेतकरी करत आहेत. 

शेतकऱ्यांना मिळणारी नुकसानभरपाई ही नुकसानग्रस्त क्षेत्रावर अवलंबून असते. एनडीआरएफच्या निकषानुसार पंचनाम्यात ३३ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त नुकसान असल्यास कोरडवाहू शेतकऱ्यांना हेक्टरी ८ हजार ५०० रुपये भरपाई मिळते.

तर बागायती पिकांना १७ हजार रुपये मिळतात. म्हणजेच कोरडवाहू पिकांना एकरी ३ हजार ४०० रुपये आणि बागायती पिकांना ६ हजार ८०० रुपये मिळतील. तर कमीत कमी कोरडवाहू पिकांसाठी किमान एक हजार आणि बागायती पिकांसाठी किमान दोन हजार रुपये भरपाईची तरतूद आहे. 

सध्या पंचनामे अंतिम टप्प्यात आले. शेतकऱ्यांनी आता तालुका पातळीवर गाव आणि मंडळनिहाय किती क्षेत्र नुकसानग्रस्त आहे, याची माहिती घ्यायला सुरुवात केली. यातून प्रशासन नुकसानग्रस्त क्षेत्र कमी दाखवत असल्याचे कळाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. म्हणजेच शेतकऱ्यांना कमीत कमी भरपाई कशी देता येईल,

याची खबरदारी प्रशासन आतापासून घेत आहे, असे शेतकरी सांगतात. नुकसानग्रस्त क्षेत्र एका एकरपेक्षा कमी दाखवल्यास एक ते दोन हजार रुपयांपर्यंतही नुकसान भरपाई मिळू शकते. खात्यात रक्कम येईल तेव्हा हे समजेलच. पण नुकसानग्रस्त क्षेत्राची होणारी नोंद भविष्यातील भरपाईची खरी पातळी दर्शवित आहे. 

नुकसानग्रस्त पिकांची नोंदही मॅनेज

पंचनामे करताना एकाच तालुक्यात सर्वच पिकांचे नुकसानग्रस्त क्षेत्र जास्त येणार नाही, याचीही काळजी घेतली जात असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तालुक्यात फक्त एखाद्याचं पिकाचे क्षेत्र जास्त आणि इतर पिकांचे क्षेत्र कमी नोंदवले जात आहे.

म्हणजेच तालुक्यात शेतकऱ्यांना एका पिकासाठी नुकसानभरपाई नोंद घेण्याजोगी भरपाई मिळेल. पण इतर पिकांसाठी मिळणार नाही. पण हा मुद्दा लगेच लक्षात येणार नाही. 

रब्बी पिकांनाही डावलण्याचा डाव

अवकाळी पावसाने अनेक ठिकाणी नुकत्याच पेरणी केलेल्या हरभरा, गहू आणि ज्वारी पिकाचे नुकसान केले. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली. पण प्रशासनाचे म्हणणे की, या पिकांना पावसाचा फटका बसला नाही.

रब्बीसाठी हा पाऊस फायद्याचा होता. शेतकऱ्यांना मात्र मोठा फटका बसला आहे. त्यामुळे रब्बीतील पेरणी केलेल्या पिकांचेही पंचनामे व्हावे आणि नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

सरकार नेहमीच नुकसानभरपाईच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक करते. भरीव काही द्यायचं नाही पण दिल्यासारखं दाखवायचं, असं सरकारचं धोरण आहे. कमी नुकसान क्षेत्र दाखवून शेतकऱ्याची दिशाभूल केली जात आहे. खरं तर या काळात शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदतीची गरज आहे. द्राक्षासारख्या पिकासाठी शेतकरी एकराला तीन तीन लाख रुपये खर्च करतात. पण नुकसानभरपाई २८ हजार मिळते, हे शेतकऱ्यांना भीक दिल्यासारखच आहे.
अनिल घनवट, शेतकर नेते आणि अध्यक्ष, स्वतंत्र भारत पार्टी
अवकाळी पावसाच्या नुकसान भरपाई नावाखाली 'झोपेतल्या शेतकऱ्यांच्या डोक्यात धोंडा टाकण्याचे' काम सरकार करत आहे. बाधित क्षेत्र कमी दाखवण्यात येत आहे. अनेक तालुक्यांत एखाद्या पिकाचेच नुकसान झाले आहे, असेही दाखवण्यात येत आहे. दुर्दैव हे की शेतकरी नुकसान भरपाईबाबत अजूनही गोड गैरसमजात आहे.
हेमचंद्र शिंदे, रावराजूर, जि. परभणी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Value Chain Development Plan : कंत्राटदार साखळी विकास योजना

Mahaagromart E-Portal : ‘महाॲग्रोमार्ट’ला स्कॉच पुरस्कार

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

Heavy Rain : आभाळ फाटले, हातातोंडाशी आलेला घास हिरावला

Sugar Factory Repayment : आमची राखीव थकहमी द्या

SCROLL FOR NEXT