Crop Survey : शेती नुकसानीचे पंचनामे करा

Crop Compensation : जिल्ह्यात झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसामुळे भात उत्पादकांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यात यावी, अशी मागणी तिरोडा तालुका व शहर कॉंग्रेस कमिटीने केली आहे.
Crop Damage
Crop Damage Agrowon
Published on
Updated on

Gondiya News : जिल्ह्यात झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसामुळे भात उत्पादकांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यात यावी, अशी मागणी तिरोडा तालुका व शहर कॉंग्रेस कमिटीने केली आहे.

तिरोडा तहसीलदारांना या विषयीचे निवेद देण्यात आहे. निवेदनात म्हटले आहे, की जिल्ह्यात २७ व २८ नोव्हेंबर रोजी मॉन्सूनोत्तर पाऊस झाला. या पावसाच्या परिणामी कापलेल्या व उभ्या भाताचे तसेच तूर, लाखोळी, जवस, हरभरा, गहू पिकाचे नुकसान झाले.

Crop Damage
Farmer Compensation : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पाच कोटींची मदत

शासनाने या नुकसानीची दखल घेत शेतकऱ्यांना भरपाई म्हणून भाताला एकरी २५ हजार तर कडधान्याला १० हजार रुपयांची मदत द्यावी. याशिवाय शेतकऱ्यांना २०२३-२४ या खरीप हंगामातील पीकविम्याची रक्‍कम अद्याप मिळाली नाही. पीकविमा कंपनीच्या घशातच प्रिमियमच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा पैसा घाताला जात असल्याचे चित्र आहे.

शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळावी यासाठीदेखील प्रयत्न करावा. भाताला एक हजार रुपये बोनस द्यावा. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली होती. ही रक्‍कम देण्याबाबतही शासन गंभीर नसल्याचे स्थिती आहे.

Crop Damage
Grape Crop Damage : सरकारने द्राक्ष शेतीला सोडले वाऱ्यावर

या मुद्द्यांवर वारंवार शेतकऱ्यांनी सरकारचे लक्ष वेधले. परंतु त्याची कोणतीच दखल घेण्यात आली नाही. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांच्या पाल्यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्तीचे धोरण राबविण्यात यावे, अशी मागणीदेखील करण्यात आली आहे.

या वेळी काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष दिलीप बनसोड, जिल्हा बॅंक उपाध्यक्ष राधेलाल पटले, रमेश टेंभरे, शिवकुमार पाटील, संजय जांभूळकर, गौरी परिहार, माया शेंडे, विरचंद नागपुरे, पवन मोरे, सौरभ चव्हाण, विरचंद नागपुरे, अनिश भोयर, जनक लिल्हारे उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com