Akola News : तालुक्यामध्ये मॉन्सूनोत्तर पावसाचा जोर ओसरला असला तरी या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. परिसरात खरिपातील पिकांसोबत रब्बीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
गेल्या काही दिवसांत झालेल्या पावसाचा संत्रा, कपाशी, तूर तसेच रब्बी पिकांना फटका बसला. पावसासोबतच आता मोठ्या प्रमाणात धुके पडत असल्याने पिकांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे.
नोव्हेंबरमध्ये अकोट मंडलात १७.८ मिमी, मुंडगाव २७.८, पणज ६२.८ , चोहोट्टा ७३.२, कुटासा ७३.२, आसेगाव ५५.३, उमरा ३७.६, अकोलखेड ६२.८ अशी पावसाची नोंद झालेली आहे.
यामध्ये अकोलखेड, पणज आणि उमरा या महसूल मंडलांमध्ये सर्वाधिक संत्रा बागा आहेत. सध्या नुकसान समोर आलेले नसले तरी येत्या काळात या अवकाळीचे दुष्परिणाम बघायला मिळणार आहेत.
सध्या असलेल्या मृगबहाराच्या फळांची गळती आणि आता असलेल्या आंबिया बहाराच्या संत्रा बागा ताण अवस्थेतील नियोजन चुकल्यामुळे त्याचा परिणाम बहर फुटीवर निश्चित होऊ शकतो.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.