Banana Crop Damage  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : चार हजार हेक्टर क्षेत्र पावसाने बाधित

unseasonal Rain : मागील तीन दिवसांत जिल्ह्यात मॉन्सूनोत्तर पावसामुळे ४ हजारांहून हेक्टर अधिक शेतीक्षेत्र बाधित झाले आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली.

Team Agrowon

Sangli News : मागील तीन दिवसांत जिल्ह्यात मॉन्सूनोत्तर पावसामुळे ४ हजारांहून हेक्टर अधिक शेतीक्षेत्र बाधित झाले आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधितांना तातडीने नुकसानग्रस्त पिकांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून शासनास तत्काळ अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या.

या वेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार, मिरज प्रांताधिकारी उत्तम दिघे, मिरज उपविभागीय कृषी अधिकारी रमाकांत भजनावळे, तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे, तंत्र अधिकारी (विस्तार) एन. डी. माने, ‍मिरज तालुका कृषी अधिकारी मिलिंद निंबाळकर व तासगाव तालुका कृषी अधिकारी सर्जेराव अमृतसागर, संबंधित तालुक्याचे गटविकास अधिकारी, तलाठी, कृषी सहायक उपस्थित होते.

मंत्री खाडे म्हणाले, ‘‘जिल्ह्यात सलग तीन दिवस अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे द्राक्ष, ज्वारी, दोडका, आंबा, पपईसह अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये मिरज, तासगाव, जत, कवठेमहांकाळ येथील पिकांना मॉन्सूनोत्तर पावसाचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. ४ हजार २३९ हेक्टर नुकसानग्रस्त आहे.

यामध्ये द्राक्ष ४ हजार १३० हेक्टर, आंबा ४५ हेक्टर, पपई १० हेक्टर, रब्बी ज्वारी ५४ हेक्टर क्षेत्र नुकसानग्रस्त आहे. गत वर्षी २ हेक्टरप्रमाणे दिलेली भरपाई यंदा ३ हेक्टरप्रमाणे दिली जाणार आहे. यामध्ये कोरडवाहू क्षेत्रासाठी ८ हजार ५०० प्रतिहेक्टर, बागायत क्षेत्रासाठी १७ हजार प्रतिहेक्टर, तर फळपिकासाठी २२ हजार ५०० प्रतिहेक्टरप्रमाणे संदर्भात दिली जाणार असल्याचे स्पष्ट केले.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत मॉन्सूनोत्तर पावसाने झालेल्या नुकसानीबाबत चर्चा घडवून आणू. पंचनाम्याच्या अहवालानुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agri Innovation: वाशीम जिल्ह्याची चिया सीड मूल्यवर्धनाच्या दिशेने वाटचाल

Agriculture Officers Issue: लॅपटॉप दिला तरच सिम कार्ड वापरणार

Water Leakage: पाईट येथील बंधाऱ्याच्या दरवाजांना अज्ञाताकडून छिद्रे

Salokha Yojana: सलोखा योजनेस २०२७ पर्यंत मुदतवाढ

Natural Sugar AI Project: नॅचरल शुगरचा एआय प्रकल्प प्रेरणादायी: प्रतापराव पवार

SCROLL FOR NEXT