Crop Damage : पावसाचा ३० हजार हेक्टरला फटका

Unseasonal Rain : मॉन्सूनोत्तर पावसामुळे जिल्ह्यातील आठ तालुक्यांतील ३७ हजार ६१७ शेतकऱ्यांच्या २९ हजार ७७५ हेक्टर शेतीला फटका बसला आहे.
पावसाचा पिकांना फटका
पावसाचा पिकांना फटकाAgrowon
Published on
Updated on

Solapur News : मॉन्सूनोत्तर पावसामुळे जिल्ह्यातील आठ तालुक्यांतील ३७ हजार ६१७ शेतकऱ्यांच्या २९ हजार ७७५ हेक्टर शेतीला फटका बसला आहे. कृषी विभागाने नुकसानीचा हा नजरअंदाज अहवाल जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे सादर केला आहे. सध्या नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेशही दिले असून, आठ दिवसांत नुकसानीचा अंतिम आकडा समोर येईल.

या आठवड्यात २८ आणि २९ नोव्हेंबरला जिल्ह्यात मॉन्सूनोत्तर पावसाने जोरदार हजेरी लावून, जिल्ह्यातील द्राक्ष, केळी, डाळिंब या प्रमुख पिकांसह कांदा, टोमॅटोसह अन्य भाजीपाल्याचे यात नुकसान केले. माढा, पंढरपूर, बार्शी आणि करमाळा हे चार तालुके वगळता अन्य सात तालुक्यांत सर्वाधिक नुकसान झाल्याचे या अंदाजात नमूद केले आहे.

पावसाचा पिकांना फटका
Unseason Rain : वादळी पावसाने घेतले दोनशेवर जनावरांचे बळी

तसेच माळशिरस आणि मोहोळ तालुक्यांतील जिरायती क्षेत्रावरील पिकांचे काहीच नुकसान झाले नाही, असेही त्यात म्हटले आहे. परंतु या तालुक्यांतही नुकसान झाले असताना, त्याकडे नजरअंदाज झाल्याचे दिसून येते. परंतु पंचनाम्यानंतरच नेमके नुकसान कळणार आहे.

आठ तालुक्यातील साधारण २० हजार ३३१ हेक्टरवरील जिरायती पिकांचे नुकसान झाले असून, सहा हजार ३१३ हेक्टरवरील बागायती आणि तीन हजार १३२ हेक्टरवरील फळपिकांचे नुकसान झाले आहे.

पावसाचा पिकांना फटका
Unseasonal Rain Crop Damage : खानदेशात पावसाने कापूस, तूर, फळबागांची मोठी हानी

मॉन्सूनोत्तर पावसाचा सर्वाधिक फटका दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. या एकाच तालुक्यात सर्वाधिक २१ हजार २४८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे, असे त्यात म्हटले आहे.

तालुकानिहाय नुकसान आणि कंसात शेतकरी संख्या

अक्कलकोट- ३४७ हेक्टर (५१३), मोहोळ- ४८२ हेक्टर (६१०), सांगोला-४४.९० हेक्टर (७६), दक्षिण सोलापूर-२१ हजार २४८ (२७,३६०), उत्तर सोलापूर-१८९२ हेक्टर (२४८५), मंगळवेढा-५७५५ हेक्टर (६५६६), माळशिरस-६.८० हेक्टर (७) एकूण ः २९ हजार ७७५.७० हेक्टर (३७, ६१७).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com