Chana Crop Damage
Chana Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Chana Crop Damage : ‘मान्सून्नोत्तर’मुळे १ लाख हेक्टरवरील हरभरा पिकाला तडाखा

माणिक रासवे : अॅग्रोवन वृत्तसेवा

Parbhani News : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील रब्बी हंगामातील प्रमुख नगदी पीक असलेल्या हरभरा पीकाला मागील नोव्हेंबर महिन्यात झालेल्या मान्सूनोत्तर पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. या दोन जिल्ह्यातील तब्बल १ लाख ३१ हजार ११३ हेक्टरवरील हरभरा पीकाचे ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांना सुरुवातीला पेरणी केलेले हरभरा मोडून दुबार पेरणी करावी लागली. खर्चाचा भार सोसावा लागला.

या दोन जिल्ह्यांत मान्सूनोत्तर पावसामुळे बुरशीजन्य मर रोगाचा मोठ्या प्रमाणावर प्राद्रुर्भाव झाला. त्यामुळे हरभऱ्याचे पीक विरळ झाले. काढणी करताना शेतात पडलेल्या सोयाबीनची मोठ्या प्रमाणावर उगवण झाली. अनेक भागात घाटे अळीचा मोठा प्राद्रुर्भाव झाला. या कारणांनी शेतकऱ्यांना सुरुवातीला पेरणी केलेला हजारो हेक्टरवरील हरभर मोडून टाकावा लागला.

त्यात मर रोग प्राद्रुर्भावग्रस्त हरभऱ्याचे क्षेत्र अधिक आहे.अजूनही अनेक भागात मर रोगाचा प्राद्रुर्भाव आढळून येत असल्याने बाधित क्षेत्रात दिवसागणिक भर पडत असल्याचे चित्र आहे. परभणीत ता. २६ ते २८ नोव्हेंबर या कालावधीत वादळी वाऱ्यासह जोरदार मान्सूनोत्तर पाऊस झाला.

परभणी, जांब, झरी, सिंगणापूर, पिंगळी, जिंतूर, सावंगी म्हाळसा, बामणी, बोरी, आडगाव बाजार, चारठाणा, वाघी धानोरा, दूधगाव, देऊळगाव, कुपटा, कोल्हा, ताडबोरगाव, कासापुरी, पूर्णा, ताडकळस, लिमला, कात्नेश्वर, चुडावा या २३ मंडलात अतिवृष्टी झाली. इतरही मंडलात जोरदार पाऊस झाला. खरिप व रब्बीतील मिळून ९५ हजार हेक्टरवरील पीकांचे ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले.

त्यात हरभरा पीकाचे बाधित क्षेत्र सर्वाधिक म्हणजे ४८ हजार ५२७ हेक्टर आहे. नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हिंगोली जिल्ह्यातील सर्व पाच तालुक्यामध्ये जोरदार पाऊस झाला. २७ नोव्हेंबरला हिंगोली, बासंबा, डिग्रस कऱ्हाळे, माळहिवरा, कळमनुरी, नांदापूर, वाकोडी, हट्टा, औंढा नागनाथ, येळेगाव, साळणा, जवळा बाजार या १२ मंडलात अतिवृष्टी झाली.

जोरदार पावसामुळे पीकांमध्ये पाणी साचून राहिले. खरीप व रब्बीतील मिळून १ लाख हेक्टरवरील शेतीपिकांचे ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झाले. त्यात एकट्या हरभऱ्याचे बाधित क्षेत्र ८२ हजार आहे.

नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात २२ एकरवर हरभऱ्याची पेरणी केली.परंतु अवेळी पावसानंतर मर रोगामुळे १५ एकर हरभरा मोडून टाकला.त्यानंतर १० एकर गहू व ५ एकर करडईची पेरणी केली.
शंकर गुट्टे, बेलुरा,जि.हिंगोली.
सोयाबीन काढणीनंतर दहा एकर हरभरा पेरला. त्यावेळी घरचे बियाणे होते. परंतु अवेळी पावसामुळे मर रोगाचा प्राद्रुर्भाव झाला.पीक विरळ झाल्यामुळे संपूर्ण हरभरा मोडून टाकवा लागला. १० एकरवर दुबार पेरणीसाठी बियाणे विकत घ्यावे लागले खते, बियाणे मजुरी मिळून ३० हजारांवर रुपये खर्च झाला.
राजाभाऊ जावळे, झरी (कोक), जि. परभणी

मान्सूनोत्तर पावसामुळे ओलावा निर्माण झाला.त्यामुळे जमिनीतील फ्युजारियम ऑक्झीस्पोरम सायसेरी या बुरशीची वाढ झपाट्याने झाली. परिणामी हरभरा पीकांवर मोठ्या प्रमाणावर मर रोगाचा प्राद्रुर्भाव आढळून येत आहे. बीजप्रक्रिया करुन पेरणी केलेल्या पिकांवर तुलनेने प्राद्रुर्भाव कमी दिसत आहे.

- डॉ. चंद्रशेखर अंबाडकर, वनस्पतीरोगशास्त्रज्ञ, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

मान्सूनोत्तर पाऊस हरभरा पीक बाधित क्षेत्र (हेक्टरमध्ये)

तालुका बाधित क्षेत्र

परभणी ९९५८

जिंतूर १०६३३

सेलू २३००

मानवत ७१६३

पाथरी १५७३

सोनपेठ ६५८७

पूर्णा १०३१३

हिंगोली १९४८१

कळमनुरी १७८३५

वसमत १४८४६

औंढा नागनाथ १५३६०

सेनगाव १५०६४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : कंदर भागात वादळी वाऱ्यामुळे केळी, ऊस, पपई भुईसपाट

Sugar Industry : ‘डीएसटीए’कडून आज चर्चासत्राचे आयोजन

Agri Tourism Festival : ग्रामसंस्कृतीतून राज्यात कृषी पर्यटनाला सुवर्णसंधी

Cotton Variety : एका कापूस वाणाची जादा दराने विक्री

Hailstorm : माण तालुक्यात बिजवडी, जाधववाडी परिसरात गारपीट

SCROLL FOR NEXT