Chana Crop Damage : संग्रामपूरला शेकडो एकरातील हरभऱ्यावर फिरवला ट्रॅक्टर

Unseasonal Rain Crop Damage : गेल्या महिन्यात झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसाने या तालुक्यात कपाशी, तूर, हरभरा, गहू या रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाले.
chana Crop
chana Crop Agrowon

Buldhana News : गेल्या महिन्यात झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसाने या तालुक्यात कपाशी, तूर, हरभरा, गहू या रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाले. तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी रब्बीत लागवड केलेल्या हरभरा पिकावर ट्रॅक्टर फिरवल्याचे विदारक चित्र आहे. या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आहे.

साधारणतः दिवाळीच्या मुहूर्तावर रब्बीचा हंगाम सुरू झाला होता. सोयाबीन तयार झाल्यावर शेतकऱ्यांनी गहू, हरभरा या रब्बी पिकांच्या लागवडीची तयारी सुरू केली होती. गेल्या महिन्यातील शेवटच्या आठवड्यात पावसाने या तालुक्यात धुमाकूळ घातला.

chana Crop
Chana Crop Damage : आठ एकरांतील हरभरा पिकावर शेतकऱ्याने फिरवला नांगर

त्यामुळे कापूस, तूर, या खरीप पिकांचे नुकसान झाले. हजारो क्विंटल कापूस शेतात भिजला. व्यापारी या भिजलेल्या कापसाला अत्‍यंत कमी भावात खरेदी करीत आहेत. तूर पिकाचे पण नुकसान झाले. तुरीच्या शेंगा गळून पडल्या. शेतात आता केवळ तुराट्या उभ्या आहेत. पावसाची संक्रांत आल्याने शेतकरी पार उद्‍ध्वस्त झाला आहे. पावसानंतर ओलाव्यामुळे मर रोगाचे प्रमाण वाढले. तालुक्यात शेकडो शेतकऱ्यांनी हरभरा पिकावर रोटाव्हेटर फिरविले आहे.

chana Crop
Chana Crop : समस्यांनुसार हरभरा पिकाचे व्यवस्थापन

मी माझ्या तीन एकरात हरभरा पेरणी केली होती. पण पावसामुळे हरभरा पिकावर मर रोगाचे आक्रमण झाल्‍याने अंकुरलेल्या हरभरा रोपावर किडीचा प्रादुर्भाव झाला. त्‍यामुळे हरभरा पिकावर ट्रॅक्टर फिरवण्याशिवाय पर्याय नव्हता. दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे.- श्रीकृष्ण राऊत, तामगाव, जि. बुलडाणा

दुबार पेरणी करायची झाल्यास शेतकऱ्यांना १५ जानेवारीपर्यंत ज्वारीचे पीक घेता येईल. सोयाबीन, तीळ, जवस आदी पिके पण घेता येतील. यासाठी ओलिताची सोय असणे आवश्यक आहे. २० डिसेंबरपर्यंत उशिरा येणाऱ्या हरभरा वाणाची पेरणीसाठी निवड करता येईल. पण बीजप्रक्रिया करून पेरणी करावी.
अमोल बनसोड, तालुका कृषी अधिकारी, संग्रामपूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com