Cotton Producion Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Productivity : सिंचनाच्या अभावामुळे कापूस उत्पादकतेत पिछाडी

Agriculture Irrigation : ऑस्ट्रेलियात १५०० शेतकऱ्यांद्वारे तीन लाख हेक्‍टर क्षेत्रावर कपाशी लागवड होत असताना त्यांची उत्पादकता प्रति हेक्‍टरी ५० क्‍विंटल आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News : ऑस्ट्रेलियात १५०० शेतकऱ्यांद्वारे तीन लाख हेक्‍टर क्षेत्रावर कपाशी लागवड होत असताना त्यांची उत्पादकता प्रति हेक्‍टरी ५० क्‍विंटल आहे. त्यांच्या कापसाची गुणवत्तेबाबत स्वतंत्र ओळख आणि ब्रॅण्ड आहे.

त्या तुलनेत भारतात १३० लाख हेक्‍टरवर लागवड होणाऱ्या कापसापासून अवघी १२ क्‍विंटलची उत्पादकता मिळते. भारतात कापसाची उत्पादकता कमी असण्यामागे सिंचन सुविधांचा अभाव हे मुख्य कारण असल्याचे प्रतिपादन केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक डॉ. वाय. जी. प्रसाद यांनी केले.

कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन टेक्स्टाइल इंडस्ट्रीज यांच्या वतीने आयोजित कापूस शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. ते म्हणाले, की भारतात कापसाची उत्पादकता वाढावी याकरिता सघन, अतिसघन कापूस लागवडीला प्रोत्साहन दिले जात आहे. राज्यात २२ हजार शेतकऱ्यांच्या माध्यमातून या प्रकल्पाची अंमलबजावणी होत आहे.

मालवाडा येथील प्रगतिशील शेतकरी व एचडीपीएस तंत्रज्ञानाची सर्वांत आधी मुहूर्तमेढ रोवणारे दिलीप ठाकरे म्हणाले, की अतिसघन किंवा सघन पद्धतीत शास्त्रोक्‍त व्यवस्थापन हा महत्त्वाचा घटक ठरतो. तण नियंत्रण त्यासोबतच पीक वाढ संजीवकांचा वापर वेळीच करावा लागतो.

सोबतच पिकाची वेळीच काढणी केल्यास गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भावही नियंत्रणात ठेवता येतो. कापसाच्या वेचणीनंतर पऱ्हाटीवर प्रक्रिया करुन ब्रिकेट, खत अशाप्रकारे मूल्यवर्धन केल्यास त्यातून अतिरिक्‍त पैशांची उपलब्धता होते. त्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संस्थेचे प्रमुख डॉ. के. पंडीयान यांनी केले. डॉ. ए. एस. तायडे यांनी या प्रकल्पाच्या अंमलबजावणीची माहिती दिली.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे यांनी कृषी विभागाच्या योजनांविषयी सांगितले. अंकुर सीड कंपनीचे व्यवस्थापक अमोल शिरसाट यांनी सघन कापूस लागवड पद्धतीत बियाणे दर वाढत असला, तरी उत्पादकता देखील वाढत असल्याने हा पर्याय निश्‍चितच फायदेशीर ठरतो, असे सांगितले. या वेळी कापसाचे अधिक उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

त्यामध्ये स्वप्नील शेळके, विजय मानकर, शेषराव सपकाळ, कृपाकर बारबुद्धे, गणेश गावंडे, शरद साठे, श्‍याम शिंगाडे, लक्ष्मण दहिहांडे, सोमेश्‍वर सवई, दिलीप ठाकरे यांचा समावेश होता. तज्ज्ञांमध्ये डॉ. शैलेश गावंडे, डॉ. रामकृष्णा, अंकुर सीडचे डॉ. अमोल शिरसाट, डॉ. समीर वड्याळकर, राशी सिडचे गेडाम यांनाही सन्मानीत करण्यात आले. सूत्रसंचालन गोविंद वैराळे यांनी केले.

उत्पादकता कमी असल्याने प्रकल्पाची अंमलबजावणी

२०२१-२२ मध्ये कापसाची उत्पादकता कमी असल्याचे २०२३ मधील आढावा बैठकीत समोर आले. याच बैठकीत उत्पादकता वाढीसाठी एचडीपीएस प्रकल्प राबविण्यासंदर्भाने केंद्रीय कृषी मंत्रालय आणि वस्त्रोद्योग यांनी एकत्रितपणे ठरविले. महाराष्ट्रात गुजरातच्या तुलनेत सिंचन क्षेत्र कमी आहे. त्यामुळे देखील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची उत्पादकता कमी असल्याचे केंद्रीय कृषी मंत्रालयाचे डॉ. ए. एल. वाघमारे यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Procurement : हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी ४७८ केंद्रे

Livestock Census : राज्यात ॲपद्वारे होणाऱ्या पशुगणनेस आजपासून प्रारंभ

Dana Cyclone : ‘डाना’ चक्रीवादळ आज किनाऱ्याला धडकण्याची शक्यता

Fruit Crop Insurance Issue : फळपीक विमा योजनेत बोगस अर्जांचे ‘पीक’

Vidarbha Weather : विदर्भात पावसाला पोषक हवामान

SCROLL FOR NEXT