Cotton production Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Production : एकाच वेचणीत कापसाची उलंगवाडी

Cotton Production : कोरडवाहू भागात एकाच वेचणीत कापासाची उलंगवाडी होत असल्‍याचे दिसत आहे. तर ज्‍या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे, ते उशिरा लागलेल्‍या कैऱ्या जगविण्यासाठी धडपड करीत आहेत.

Team Agrowon

Buldana News : तालुक्‍यामध्ये पावसाचे प्रमाण अत्‍यल्‍प असल्‍याने यावर्षी शेतकऱ्यांचे नगदी पीक म्‍हणून ओळखल्‍या जाणाऱ्या कपाशीला मोठा फटका बसला आहे. कोरडवाहू भागात एकाच वेचणीत कापासाची उलंगवाडी होत असल्‍याचे दिसत आहे.

तर ज्‍या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे, ते उशिरा लागलेल्‍या कैऱ्या जगविण्यासाठी धडपड करीत आहेत. परंतु त्‍यालाही महावितरणकडून वीज पुरवठा खंडित करून खोडा घातला जात आहे.

मलकापूर तालुक्‍यात यंदा खरीप हंगामात मोठ्या प्रमाणावर कपाशीचा पेरा झाला आहे. गतवर्षी सोयाबीन व कापसाला अपेक्षित भाव शेतकऱ्यांना मिळाला नसला तरी नगदी पीक म्‍हणून शेतकऱ्यांची पसंती कापूस व सोयाबीन पिकालाच असल्‍याचे दिसले. परंतु सोयाबीन पाठोपाठ कपाशीच्‍या पिकानेही माना टाकल्‍याने उत्‍पादनात निम्‍म्‍यापेक्षा जास्‍त घट होईल, असे चित्र आहे.

कोरडवाहू भागातील कपाशी पिकाचा तर एका वेचणीतच खराटा झाला आहे. दरम्‍यान, नळगंगा प्रकल्‍पालगत असलेल्‍या गावांमध्ये पाणी उपलब्‍ध असले तरी पिकांना पाणी देताना भारनियमनाचा खोडा पडत आहे. बागायती क्षेत्रातील पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. कोरडवाहू भागात कापसाचे एकरी दोन ते तीन क्‍विंटल उत्‍पादन होईल, असे शेतकऱ्यांनी सांगितले.

हीच परिस्‍थिती बागायती असलेल्‍या शेतकऱ्यांची देखील आहे. एरवी दहा ते पंधरा क्‍विंटलपर्यंत एकरी उत्‍पादन घेणारे शेतकरी यावर्षी चार ते पाच क्‍विंटल कापसाचे उत्‍पादन मिळेल, असे सांगत असल्‍याने तालुक्‍यातील दुष्काळाची छाया गडद होत असल्‍याचे चित्र आहे.

दर वर्षी कापूस पिकातून शेतकऱ्यांना मोठे उत्‍पादन व उत्‍पन्न मिळत असते. परंतु सद्यःस्‍थितीत परिसरात पावसाने खोडा घातल्‍याने कपाशीचे पीक अंतिम घटका मोजत आहे. नदीकाठच्‍या भागात असलेले थोडेफार पाणी पिकांना देण्यासाठी शेतकरी धडपडत असला तरी सतत गायब राहणारी वीज पिकांना पाणी देण्यात अडचणीची ठरत आहे. परिणामी यंदा एकरी पाच क्‍विंटल कापूस होणे देखील कठीण आहे.
- कैलास पाटील, घिर्णी, ता. मलकापूर, जि. बुलडाणा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT