Latest Agriculture News : तालुक्यामध्ये पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने यावर्षी शेतकऱ्यांचे नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपाशी पिकाला मोठा फटका बसला आहे. कोरडवाहू भागात एकाच वेचणीत कापसाची वेचणी संपत असल्याचे दिसत आहे.
तर ज्या शेतकऱ्यांकडे पाणी आहे ते उशिरा लागलेल्या कैऱ्या जगविण्यासाठी धडपड करीत आहेत. परंतु त्यालाही महावितरणकडून वीज पुरवठा खंडित करून खोडा घातला जात आहे.
जाफराबाद तालुक्यात यंदा खरीप हंगामात ६१ हजार ९७० हेक्टरवर लागवड करण्यात आली होती. यामध्ये सर्वाधिक क्षेत्र २८ हजार ३०० हेक्टर सोयाबीन तर वीस हजार ३७५ हेक्टरवर कापूस लागवड करण्यात आली आहे.
गतवर्षी सोयाबीन व कापसाला अपेक्षित भाव शेतकऱ्यांना मिळाला नसला तरी नगदी पीक म्हणून शेतकऱ्यांची पसंती कापूस व सोयाबीन पिकालाच असल्याचे दिसले. परंतु सोयाबीन पाठोपाठ कपाशीच्या पिकानेही माना टाकल्याने उत्पादनात निम्म्यापेक्षा जास्त घट होईल असे चित्र आहे.
कोरडवाहू भागातील कपाशी पिकाचा तर एका वेचणीतच खराटा झाला आहे. दरम्यान खडकपूर्णा प्रकल्पालगत असलेल्या गावांमध्ये पाणी उपलब्ध असले तरी पिकांना पाणी देताना भारनियमानाचा खोडा पडत आहे. बागायती क्षेत्रातील पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. कोरडवाहू भागात कापसाचे एकरी दोन ते तीन क्विंटल उत्पादन होईल असे शेतकऱ्यांनी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.