Cotton Cultivation Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Cultivation : नांदेड जिल्ह्यात पावसाच्या आशेवर कपाशी लागवड सुरु

Nanded Rain News : नांदेड जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून हलक्या पावसाच्या सरी कोसळत आहेत. परंतु शेतकरी मात्र पेरणीला उशीर झाल्याचे सांगत कपाशीसह हळद लागवड करील आहेत.

Team Agrowon

Nanded Monsoon Rain Update : नांदेड जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून हलक्या पावसाच्या सरी कोसळत आहेत. परंतु शेतकरी मात्र पेरणीला उशीर झाल्याचे सांगत कपाशीसह हळद लागवड करील आहेत. काही ठिकाणी सोयाबीन पेरणीही होत आहे.

परंतु कृषी विभागाने मात्र शंभर मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करु नये, असे आवाहन शेतकऱ्यांना केले आहे.

नांदेड जिल्ह्यात मागील वर्षी जूनच्या दुसर्‍या सप्ताहात खरिप पेरण्यांना सुरुवात झाली होती. पेरण्यांचे कामे जून महिन्यात तसेच जुलैच्या पहिल्या आठवड्यात संपली होती. परंतु जून महिन्याचा शेवटचा आठवडा उजाडला तरी पेरणी योग्य पावसाने सुरुवात केली नव्हती.

यामुळे शेतकऱ्यांना पेरण्यांची प्रतिक्षा होती. अशातच मागील तीन दिवसापासून तूरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. हा पाऊस पेरणी योग्य नसल्याने शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतिक्षा आहे.

परंतु काही ठिकाणी शेतकऱ्यांनी पाऊस होईल, या अशाने कपाशी तसेच हळद लागवड सुरु केली आहे. काही भागात सोयाबीनचीही पेरणी सुरु करण्यात आल्याची माहिती मिळाली. परंतु कृषी विभागाकडून मात्र शेतकऱ्यांना पेरणीसाठी घाई करु नये, ८० ते १०० मिलीमीटर पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

दरम्यान, मंगळवारी (ता. २७) सकाळी साडेदहापर्यंत जिल्ह्यात सरासरी ९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. हा पाऊस बिलोली तालुक्यात १२.६ मिलीमीटर, नांदेड ७.२ मिलीमीटर, किनवट १८.५ मिलीमीटर, माहूर २१ मिलीमीटर, नायगाव १४.५ मिलीमीटर, मुदखेड ९.६ मिलीमीटर, उमरी ९.१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Organic Farming: सेंद्रिय प्रमाणित शेतीचा तयार केला आदर्श

Natural Farming: विचार मंथन एका परिषदेचे!

Ethanol Policy: इथेनॉलला धोरणलकव्याचे ग्रहण

Pomegranate Yard: न्यायप्रविष्ट जागेवर पुन्हा डाळिंब यार्डाचा घाट

Sharad Joshi: ‘एक होते शरद जोशी आणि असंख्य वेडेपीर’ पुस्तक अमूल्य ठेवा

SCROLL FOR NEXT