Pink Bollworm Agrowon
ॲग्रो विशेष

Pink Bollworm : बोंड अळीमुळे कापूस उत्पादक संकटात

Cotton Crop : सिंचन क्षेत्रातील कपाशीच्या पिकावरही आता बोंड अळीचा परिणाम दिसून येत असून कवडी अधिक प्रमाणात निघते आहे.

Team Agrowon

Akola News : यंदा कोरडवाहू पट्ट्यातील कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. कमी पावसाळा व परतीचाही पाऊस न आल्याने जमिनीतील ओल कमी झाली. परिणामी दिवाळीच्या काळातच कापसाचा हंगाम उतरणीला लागला. सिंचन क्षेत्रातील कपाशीच्या पिकावरही आता बोंड अळीचा परिणाम दिसून येत असून कवडी अधिक प्रमाणात निघते आहे.

या वर्षात पश्‍चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशीम या तीनही जिल्ह्यांत सरासरीपेक्षा बराच कमी पाऊस पडला. दरवर्षी येणारा परतीचा पाऊसही न आल्याने प्रामुख्याने कोरडवाहू क्षेत्रातील कपाशी पिकाला फटका बसला आहे. पिकाची वाढ झाली. बोंड्याही लागल्या. मात्र आता कापूस वेचणी करताना बोंड अळीने केलेले नुकसान समोर येऊ लागले. शेतात कवडीचे प्रमाण वाढले आहे. दोन-तीन वेचण्यानंतरच पिकात उलंगवाडी होऊ लागली. एकरी चार ते पाच क्विंटलपर्यंतही उत्पादन निघालेले नाही.

मी आधुनिक पद्धतीने शेती करतो. दरवर्षी मला चांगले उत्पादन येते. मात्र या वर्षी मोताळा तालुक्याची परिस्थिती भयावह आहे. सोयाबीन, कापूस उत्पादकांची व्यथा वाईट आहे. उत्पादन कमी येत असल्याने लावलेल्या खर्चाचाही ताळमेळ बसेना.
- सतीश किनगे, युवा शेतकरी, खरबडी, ता. मोताळा, जि. बुलडाणा
- कपाशी पिकाला ३ वेळा पाणी आणि ५ फवारणी केली. आतापर्यंत या पिकातून एकरी ३ क्विंटल उत्पादन झाले. या वर्षी निसर्ग आणि सरकार दोन्ही पण शेतकऱ्यांच्या मुळावर बसलेले आहेत. तुरीच्या पिकाचे काही खरे दिसत नाही. पाऊस कमी असल्यामुळे तुरीला फूलधारणा तितकी नाही. वातावरणातील बदल मारक झाले आहेत.
- विनोद पाटील, शेतकी, सुदी, जि. वाशीम

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT