Cooperative Societies Elections
Cooperative Societies Elections agrowon
ॲग्रो विशेष

Cooperative Societies Elections : सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर, ३० सप्टेंबरपर्यंत स्थगिती

sandeep Shirguppe

Cooperative Societies Elections Postponed : लोकसभा निवडणुकीच्या कार्यक्रमामुळे राज्यातील सगळ्याचं निवडणूक कार्यक्रमांना ‘जैसे थे’ आदेश देण्यात आले होते. त्यामुळे ३० मेपर्यंत निवडणुकांसाठी ज्या ठिकाणी प्रक्रिया थांबवलेली होती. मतमोजणी झाल्यानंतर पुन्हा सात जूनला निवडणुका सुरू करण्याचे आदेश देण्यात आले होते. यामुळे राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांच्या हालचालींना वेग आला असताना पुन्हा स्थगिती देण्यात आली आहे. यंदा अधिक पावसाचा अंदाज असल्याने सहकारी संस्थांच्या निवडणूक कार्यक्रमाला स्थगिती दिली आहे.

ऐन पावसाळ्यात होणाऱ्या सहकारी संस्थांच्या निवडणुकींना ३० सप्टेंबरपर्यंत स्थगिती दिली आहे. याबाबतचे आदेश राज्य शासनाने प्रसिद्ध केले. राज्यातील २४, ७१० सहकारी संस्थांची निवडणूक प्रलंबित असून, पैकी ८३०५ संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया आता पावसाळा संपेपर्यंत स्थगित राहणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील २९१ संस्थांचा समावेश असल्याचे जिल्हा उपनिबंधक कार्यालयातून सांगण्यात आले.

हवामान विभागाने अंदाज व्यक्त केलेनुसार १२ जूनअखेर राज्यातील १४ जिल्ह्यांत मागील वर्षाच्या सरासरी १०० टक्केपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. पाच जिल्ह्यांत सरासरीच्या ७० टक्केपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील शेतकरी खरीप हंगामातील पेरणी, पीक लागवड व शेतीच्या इतर कामांत व्यस्त आहेत. अनेक संस्थांमध्ये शेतकरी सभासद असल्यामुळे ते सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेत सहभागी होऊ शकत नाहीत. त्यामुळे ३० सप्टेंबरपर्यंत निवडणुका स्थगित केल्या आहेत.

सहकारी गृहनिर्माण संस्थांची निवडणूक घ्या

दरम्यान, सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाने सहकारी गृहनिर्माण संस्थांची निवडणूक घेण्याचे आदेश दिले आहेत. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊन केवळ अध्यक्ष- उपाध्यक्ष निवड बाकी आहे, अशा सहकारी संस्थांना वगळून हा आदेश लागू केला आहे.

राज्य पातळीवरील निर्णय

दरम्यान सहकारी संस्थेचे कोल्हापूर जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे म्हणाले की, राज्य पातळीवरच निवडणूक स्थगितीचा निर्णय झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील २९१ निवडणुकांच्या कार्यक्रमांनाही स्थगिती दिली आहे. पावसाळी हंगाम संपल्यानंतर साधारण तीस सप्टेंबरनंतर राज्य शासनाच्या आदेशानुसार पुन्हा कार्यक्रम नियमित होतील.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Zero Tillage Technique : आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात वाहते शून्य मशागत तंत्राचे वारे

Crop Insurance : पीकविम्यासाठी अंतिम मुदतीची वाट पाहू नये

Crop Competition : खरीप हंगामासाठी पीक स्पर्धा

Farmers Protest : कर्जमाफी, पीकविमा भरपाईसाठी ‘रास्ता रोको’

Jackfruit Research : फणस संशोधन केंद्राचा प्रस्ताव निधी मंजुरीच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT