Kolhapur Fertilizer Shortage : कोल्हापूर जिल्ह्यात खतांचा तुटवडा जाणवण्याची शक्यता, कृषी विभागाचा आंधळा कारभार

Kolhapur Urea Shortage : कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक भागांत अद्याप युरिया मिळत नाही; पण कृषी अधिकारी म्हणतात, ३९ हजार मे. टन युरिया शिल्लक आहे.
Kolhapur Fertilizer Shortage
Kolhapur Fertilizer Shortageagrowon

Kolhapur Agriculture Department : राज्य सरकारची मागच्या दोन दिवसांपूर्वी खरिप हंगामापूर्व बैठक झाली या बैठकीत कृषी मंत्र्यांसह, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी राज्यात कुठेही खते, बियाणांचा तुटवडा जाणवू देऊ नका अशा सूचना केल्या. दरम्यान कोल्हापूर जिल्हा कृषी विभागाने जिल्ह्यात खतांचा पुरेसा साठा असल्याची माहिती दिली परंतु प्रत्यक्षात खतांचा पुरेसासाठा नसल्याचे चित्र स्पष्ट होताना दिसत आहे.

जिल्ह्यातील अनेक भागांत अद्याप युरिया मिळत नाही; पण कृषी अधिकारी म्हणतात, ३९ हजार मे. टन युरिया शिल्लक आहे. यावरून कागदावरील आकडेवारी व प्रत्यक्षात किती युरिया आहे, हे सांगणे यात मोठा फरक दिसत असल्याने पुन्हा एकदा कृषी विभागाचा कारभार आंधळा असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हा प्रशासनाने यात लक्ष घालून युरियाची टंचाई दूर करावी, अशी मागणी होत आहे.

खरीप व रब्बी हंगामांसाठी जिल्ह्याला १ लाख ५७ हजार २५१ मे. टन खत उपलब्ध व्हावे, अशी मागणी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे केली होती. प्रत्यक्षात १ लाख ३२ हजार २८५ मे. टन खत जिल्ह्यासाठी खताचा पुरवठा झाला आहे. म्हणजे १५ हजार टन खत कमी मिळाले. तरीही जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी म्हणतात, जिल्ह्यासाठी पुरेसा खत पुरवठा उपलब्ध आहे.

सध्या जिल्ह्यात १ लाख २२ हजार २४५ मे. टन खत शिल्लक आहे. यात ३९ हजार मे. टन युरिया शिल्लक आहे; पण अनेक तालुक्यांत खताची टंचाई मोठी आहे. अनेक कृषी सेवा केंद्रांत युरिया उपलब्ध नाही, असे सांगितले जात आहे.

Kolhapur Fertilizer Shortage
Fertilizer Price : युरियाबरोबर संयुक्त खताची सक्ती, कंपन्यांवर नियंत्रण नसल्याने थेट शेतकऱ्यांवरच भुर्दंड

सध्या पाऊस सुरु झाल्याने शेतकरी आडसाली उसाला लागवडी डोस घेत असतो परंतु ऐन सुगीच्या काळातच लागवड उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जाण्याची वेळ येण्याची शक्यता आहे.

यावरून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे का, याची चौकशी होणे गरजेचे आहे. पहिल्या पावसामुळे जिल्ह्यातील काही भागात भाताची उगवण सुरू आहे. कोळपणीनंतर पिकालां खताचा पहिला डोस देण्यासाठी शेतकऱ्याला इतर खतांबरोबर युरियाची गरज भासणार आहे.

याचबरोबर खरिपाचा डोस विचारात घेता खतांचा मुबलक वापर होणार आहे परंतु कृषी विभागाच्या दिशाभूल प्रकारामुळे शेतकरी अडचणीत येण्याची शक्यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com