Animal Care Agrowon
ॲग्रो विशेष

VNMKV Parbhani : दूध काढताना उपयोगात येणारी घडवंची, तिपाई निर्मितीसाठी करार

Agriculture Implements : भारतीय कृषी संशोधन परिषदेअंतर्गत भुवनेश्वर (ओडिशा) येथील केंद्रीय कृषिरत महिला संस्थानद्वारे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्प कृषिरत महिला प्रकल्प राबविला जात आहे.

माणिक रासवे

Parbhani News : गायी-म्हशीचे दूध काढताना बादली ठेवण्यासाठी घडवंची आणि दूध काढणाऱ्या व्यक्तीला बसण्यासाठी उपयोगात येणारी तिपाई या साधनांची निर्मिती करुन बाजारामध्ये उपलब्ध करुन देण्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ व राजस्थानमधील उदयपूर येथील सिंघवी सेल्स कार्पोरेशन यांच्यामध्ये गुरुवारी (ता. १८) सामंजस्य करार करण्यात आला.

भारतीय कृषी संशोधन परिषदेअंतर्गत भुवनेश्वर (ओडिशा) येथील केंद्रीय कृषिरत महिला संस्थानद्वारे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्प कृषिरत महिला प्रकल्प राबविला जात आहे.

याअंतर्गत शेतकऱ्यांचे श्रम कमी करणारी विविध साधने विकसित केलेली आहेत. यापैकी दूध काढण्यासाठीची घडवंची आणि तिपाई तयार करून दूध उत्पादक शेतकऱ्यांना खरेदीसाठी बाजारामध्ये सहज उपलब्ध करुन देण्यासाठी हा सामंजस्य करार करण्यात आला.

या वेळी कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांच्या उपस्थितीत संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, केंद्रीय कृषिरत महिला संस्थांच्या संचालक डॉ. मृदुला देवी, कार्पोरेशनचे संचालक दीपक सिंघवी यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

या वेळी शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके, विस्तार शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, सहयोगी अधिष्ठाता डॉ. जया बंगाळे, विभाग प्रमुख डॉ. स्मिता सोलंकी, उपविद्यापीठ अभियंता डॉ. दयानंद टेकाळे आदींची उपस्थिती होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fake Agriculture Input: बनावट निविष्ठांचे जाळे राज्यांच्या सीमापार

Jantar Mantar Protest: जंतरमंतरवरील आंदोलन आणि सप्तपर्णीची अ‍ॅलर्जी

Fake Pesticide Issue: बनावट कीडनाशके : हवी सक्षम यंत्रणा

Tissue Culture Lab Scheme: उती संवर्धन प्रयोगशाळेसाठी अर्जाची संधी

Agriculture Services Reform: कृषी विभागाच्या अकरा सेवांचे डिजिटल सुसूत्रीकरण

SCROLL FOR NEXT