VNMKV, Parbhani : वनामकृवि’च्या खरिपाच्या ६०० क्विंटलवर बियाण्याची विक्री

Kharif Season : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या व बीजोत्पादन घेतलेल्या सोयाबीन, तूर, मूग, ज्वारी या खरीप पिकांच्या विविध वाणांच्या ६१४ क्विंटलवर बियाण्याची विक्री झाली आहे.
VNMKV, Parbhani
VNMKV, ParbhaniAgrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
Seed Supplay : परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या व बीजोत्पादन घेतलेल्या सोयाबीन, तूर, मूग, ज्वारी या खरीप पिकांच्या विविध वाणांच्या ६१४ क्विंटलवर बियाण्याची विक्री झाली आहे. विविध पिकांच्या नवीन वाणांचे बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांनी रांगा लावल्या होत्या. पहिल्या दोन दिवसांत तब्बल अठराशेवर शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या ५२ व्या वर्धापन दिनानी शनिवारी (ता. १८) यंदाच्या खरीप हंगामातील बियाणे विक्रीचा प्रारंभ मान्यवरांच्या उपस्थित झाला. वर्धापनदिनी आयोजित खरीप पीक परिसंवाद आणि कृषी प्रदर्शनास मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांसह राज्याच्या विविध भागांतील सुमारे पाच हजार शेतकरी आले होते. त्यापैकी १ हजार ८०० शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी केले. विद्यापीठाद्वारे या वर्षी प्रथमच खरीप पिकांचे १ हजार १७८ क्विंटल (७९५७ बॅग) सत्‍यतादर्शक बियाणे उपलब्ध करून देण्यात आलेले होते. परभणी येथील मध्यवर्ती प्रक्षेत्रावरील बीजोत्पादना मोठी वाढ झाली. मूलभूत आणि पैदासकार बियाणे उत्पादित करून त्याचा पुरवठा महाबीज, राष्ट्रीय बीज निगम, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि खासगी बियाणे उत्पादक कंपन्यांना करावा. या कंपन्यांनी मूलभूत आणि पैदासकार बियाण्यांपासून पायाभूत व प्रमाणित बियाणे उत्पादित करून त्याचा शेतकऱ्यांना पुरवठा करतील त्यादृष्टीने विद्यापीठाची बियाणे विक्री केली जाते.

VNMKV, Parbhani
VNMKV Parbhani : ‘वनामकृवि’ आणि वेस्टर्न सिडनी विद्यापीठांत सामंजस्य करार

विद्यापीठाने महाबीजसह २६२ बियाणे कंपन्या शेतकरी उत्पादक कंपन्यासोबत सामंजस्य करार केलेले आहेत. विद्यापीठाने आजपर्यंत सोयाबीनचे १३ वाण विकसित केलेले असून, मराठवाड्यामध्ये विद्यापीठाच्या वाणाखाली ४० ते ५० टक्के क्षेत्र आहे तर तुरीचा बीडीएन-७११ या अतिशय नावाजलेल्या वाणाची ५० टक्क्यांपेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी केली जाते. या वाणासह इतर सर्व वाणांच्या बीजोत्पादनसाठी कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांच्या मार्गदर्शनात या वर्षी संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, बीजोत्पादन संचालक डॉ. देवराव देवसरकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके यांच्या मार्गदर्शनाखाली बीजोत्पादन सहसंचालक डॉ. एस. पी. मेहेत्रे, मध्यवर्ती प्रक्षेत्राचे प्रभारी अधिकारी डॉ. व्ही. के. खर्गखराटे, प्रभारी अधिकारी डॉ. संतोष शिंदे, डॉ. भानुदास भोंडे, डॉ. अमोल मिसाळ आदींनी उत्तम नियोजन करून बियाणे विक्रीसाठी उपलब्ध करून दिले.

बियाणे विक्रीच्या पहिल्या दिवशी शनिवारी (ता. १८) १ हजार ८०० शेतकऱ्यांनी ४१८.२६ क्विंटल बियाणे खरेदी केले, तर सोमवारी (ता. २०) १९६.५२ क्विंटल बियाण्याची विक्री झाली. मंगळवारी (ता. २१) विविध पिकांचे ५६३.२२ क्विंटल बियाणे शेतकऱ्यांना खरेदीसाठी उपलब्ध राहिले आहे. त्यात सोयाबीन पिकाचे एमएयुएस १५८ आणि एमएयूएस १६२ हे वाण उपलब्ध असून तुरीचा बीडीएन-१३-४१ ( गोदावरी), ज्वारीचा परभणी शक्ती आणि मुगाचा बीएम २००३-२ हे वाण उपलब्ध आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com