VNMKV Parbhani : ‘वनामकृवि’, सिंजेंटा फाउंडेशन आणि सिंजेंटा इंडियात करार

Agreement Between VNMKV, SYNGETA Foundation and SYNJETA India : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, पुणे येथील सिंजेंटा फाउंडेशन इंडिया आणि सिंजेंटा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्यामध्ये त्रिपक्षीय सामंजस्य करार करण्यात आला
Agreement Between VNMKV and SYNGETA Foundation
Agreement Between VNMKV and SYNGETA FoundationAgrowon
Published on
Updated on

Parbhani News : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, पुणे येथील सिंजेंटा फाउंडेशन इंडिया आणि सिंजेंटा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्यामध्ये त्रिपक्षीय सामंजस्य करार करण्यात आला. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातर्फे शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके यांनी तर सिंजेंटा फाउंडेशन इंडिया लिमिटेड पुणे यांच्यामार्फत संचालक राजेंद्र जोग यांनी त्रिपक्षीय करारावर स्वाक्षरी केली.

या सामंजस्य करारानुसार वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ सिंजेंटा फाउंडेशन पुणे व सिंजेंटा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या तीनही संस्था सांघिकरित्या, सहकार्यातून सुसंवादांच्या मार्गाने ग्रामीण भागातील अल्पभूधारक शेतकरी व पदविकाधारक विद्यार्थी यांचे जीवनमान उंचावण्याचा सर्वंकष प्रयत्न करतील. याकरिता शिक्षण, संशोधन यात परस्पर सहकार्य तसेच एकूणच मनुष्यबळाचे क्षमता विकास करणे हे प्राथमिक उद्दिष्ट निश्चित करण्यात आले. त्यासाठी आय राईज प्रकल्पाचे नियोजन करण्यात आले आहे.

Agreement Between VNMKV and SYNGETA Foundation
VNMKV Parbhani : ‘वनामकृवि’ आणि वेस्टर्न सिडनी विद्यापीठांत सामंजस्य करार

डॉ. इंद्र मणी म्हणाले, की ग्रामीण भागातील अल्पभूधारक शेतकरी व कृषी पदविकाधारक विद्यार्थी यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडून येतील. नवीन शैक्षणिक धोरण २०२० नुसार मायबोलीतून शिक्षण अनिवार्य आहे. या सामंजस्य करारानुसार राबविण्यात येणाऱ्या आय राईज प्रकल्पामुळे पदविका विद्यार्थ्यांना एक नवी उमेद मिळेल.

Agreement Between VNMKV and SYNGETA Foundation
VNMKV Parbhani : ‘वनामकृवि’ आणि भारतीय कृषी संशोधन संस्थेत सामंजस्‍य करार

आय राईज प्रकल्पाद्वारे कृषितंत्र पदविकेच्या द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांना त्यांच्या मायबोलीतून औद्योगिक क्षेत्रास आवश्यक असणाऱ्या अशा अनुरूप कृषी तंत्रज्ञानाचे शिक्षण हे एक महिन्याच्या प्रशिक्षणातून प्राप्त होणार आहे व प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या संपर्कात राहून कार्यानुभवाची संधी मिळणार आहे. त्यानंतर इच्छुक उमेदवारांना औद्योगिक क्षेत्रात रोजगार प्राप्त करण्याकरिता तसेच स्वयंरोजगाराच्या संधीसाठी त्रिपक्षीय मदत मिळणार आहे.

सहयोगी अधिष्ठाता (शिक्षण) डॉ. गजेंद्र लोंढे व सिंजेंटा फाउंडेशन इंडियाचे विक्रम बोराडे यांनी विशेष पुढाकार घेतला. या वेळी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक, डॉ. धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, एनबीएसएसएलयुपी, नवी दिल्लीचे विभाग प्रमुख डॉ. जे. पी. शर्मा, आयडीआयएआरआय, नवी दिल्लीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. मानसिंग, महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे संचालक डॉ. हरिहर कौसडीकर, विभाग प्रमुख डॉ. डी. एस. पेरके, प्राचार्य डॉ. नरेशकुमार जायेवार यांची उपस्थिती होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com