Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage Issue : सततच्या पावसाने अडीच लाख हेक्टरला फटका

Heavy Rain : अमरावती विभागात झालेला मुसळधार पाऊस, अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले. विभागात २ लाख ५० हजार हेक्टरवरील पिकांना फटका बसला.

Team Agrowon

Yavatmal News : अमरावती विभागात झालेला मुसळधार पाऊस, अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले. विभागात २ लाख ५० हजार हेक्टरवरील पिकांना फटका बसला. यात यवतमाळ जिल्ह्यातील एक लाख ७० हजार हेक्टरचा समावेश आहे.

खरीप हंगामाच्या सुरुवातीपासून शेतकऱ्यांवर एकामागून एक संकट सुरूच आहे. मॉन्सून वेळेत दाखल झाला असला तरी काही दिवसांतच वाटचाल मंदावली होती. त्यानंतर दमदार पावसाला सुरुवात झाली. नदी, नाल्यांना आलेल्या पुरामुळे पिकांचे नुकसान झाले. शेतात पाणी साचल्याने पिकांना फटका बसला.

या काळात जवळपास दहा दिवस पावसाची संततधार कायम होती. अतिपावसामुळे पिकांची वाढ खुंटली होती. जास्त पावसामुळे पीक पिवळे पडली. त्यानंतर कीड रोगाने पिकांवर आक्रमण केले. सोयाबीन, कापूस पीक अडचणीत येण्याची भीती शेतकऱ्यांना वाटत होती. या संकटांचा शेतकऱ्यांनी समर्थपणे सामना केला.

पिकांची काळजी घेत, पिकांना जीवनदान दिले. त्यानंतर पीक चांगल्या स्थितीत दिसत होते. दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार व अतिवृष्टीमुळे पीक पुन्हा संकटात आले आहे. पावसाचा अमरावती विभागातील दोन लाख ५० हजार हेक्टरला फटका बसला. यात सर्वाधिक नुकसान यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे झाले आहे. यानंतर बुलडाणा, वाशीम, अकोला व अमरावती जिल्ह्याचा क्रमांक लागतो.

सोयाबीन, तुरीवर किडींचा प्रादुर्भाव

सततच्या पावसामुळे काही भागांतील सोयाबीन पिवळे पडायला सुरवात झाली आहे. पिकांची वाढ खुंटून पीक पिवळे पडले आहे. अशीच स्थिती कपाशीची आहे. पिकांवर कीड रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने काही भागात ‘मर’ रोगही पिकांवर दिसून येत आहे. तूर पीकही अडचणीत येण्याची शक्यता असल्याने उत्पादनात घट येण्याची भीती शेतकऱ्यांना आहे.

जिल्हा-पिकांचे झालेले नुकसान (हेक्टर मध्ये)

यवतमाळ १लाख ७६ हजार

अकोला ४१ हजार ८८६

बुलडाणा ११ हजार ६०९

वाशीम ९ हजार ९३३

अमरावती ५५७

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT