Rain Update Agrowon
ॲग्रो विशेष

Rain Update : भोर तालुक्यात संततधार पाऊस सुरू

Rain News : शहर आणि तालुक्यात शनिवारपासून (ता.२०) संततधार पाऊस सुरू असून, ओढे-नाले व नद्यांमधील पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे.

Team Agrowon

Pune News : शहर आणि तालुक्यात शनिवारपासून (ता.२०) संततधार पाऊस सुरू असून, ओढे-नाले व नद्यांमधील पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. भोर शहरातील राजवाडा चौकाजवळील शनीघाटावर भोलावडे गावाला जाणारा नीरा नदीवरील छोट्या पुलावरून पाणी वाहू लागल्यामुळे या पुलावरील मार्ग बंद झाला आहे.

तालुक्याच्या नीरा देवघर धरणाच्या बाजूला असलेल्या हिर्डोशी व आंबवडे खोऱ्यात पावसाचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे या वर्षी प्रथमच रविवारी (ता.२१) पहाटे पुलावरून पाणी पडण्यास सुरुवात झाली.

गेल्या वर्षी १८ जुलैला भोर ते भोलावडे गावाला जोडणाऱ्या छोट्या पुलावरून पाणी वाहत होते. याशिवाय भाटघर धरणाच्या बाजूला असलेल्या भूतोंडे व वेळवंड खोऱ्यातही मुसळधार पाऊस पडत आहे.

नीरा-देवघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील नीरा नदीच्या उगमस्थानी शिरगाव येथे मागील २४ तासांत रविवारी (ता.२१) सायंकाळी सहा वाजेपर्यंत ६६ मिमी पावसाची नोंद झाली असून या वर्षी आजपर्यंत २ हजार ११ मिमी पाऊस झालेला आहे.

भाटघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील भुतोंडे येथे ४८ मिमी पावसाची नोंद झाली असून तेथे यावर्षी १ हजार ८०३ मिमी पाऊस झालेला आहे. रविवारी सकाळी नीरा-देवघर धरणात ३९.४५ टक्के, तर भाटघर धरणात ४८.५२ टक्के पाणीसाठा झाला आहे. तालुक्यात सर्वदूर संततधार पाऊस सुरू आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Farmer Compensation: दुष्काळात पाणी, चारा, रोजगाराला प्राधान्य

Drought Relief Planning: दुष्काळ निवारणाचे सूक्ष्म नियोजन करू : फडणवीस

Global Research: युवा संशोधकांनी जागतिक संशोधनात सहभागी व्हावे; डॉ. इनिश ट्रिस्चेर यांचे आवाहन

Sweet Potato Demand: रताळ्यांच्या मागणीत वाढ

Maharashtra Drought: काळीज पिळवटून टाकणारा दुष्काळ

SCROLL FOR NEXT