Heavy Rain : मुसळधारेने धरणांच्या साठ्यात वाढ

Dam Water Storage : कोकण, घाटमाथा आणि विदर्भातील धरणक्षेत्रात मागील आठ दिवसांपासून धुवाधार पाऊस कोसळत आहे.
Dam Water Storage
Dam Water StorageAgrowon
Published on
Updated on

Pune News : कोकण, घाटमाथा आणि विदर्भातील धरणक्षेत्रात मागील आठ दिवसांपासून धुवाधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे केवळ सहा दिवसांत राज्यातील धरणांत तब्बल ८५.२७ टीएमसी पाण्याची आवक झाली असून, पावणेदोन महिन्यात २०४.१५ टीएमसी एवढा येवा दाखल झाला आहे.

दरम्यान वारणा, कोयना, मुळशी, उजनी, भाटघर, वरसगाव, भंडारदरा, मुळा, दारणा, धामणी, माजलगाव, इटियाडोह, गोसी खुर्द, जायकवाडी, ऊर्ध्व वर्धा या धरणांतील पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यातील धरणांतील पाणीसाठा सुमारे ५२७.८६ टीएमसी म्हणजेच ३६ टक्क्यांवर पोहोचला आहे.

मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यांवर जोर कायम :

मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत मागील काही दिवसांपासून चांगलाच पाऊस पडत आहे. प्रामुख्याने घाटमाथ्यांवर पावसाचा जोर अधिक आहे. ताम्हिणी घाटमाथ्यांवर सर्वाधिक १६८ मिलिमीटर, तर शिरगाव ११४, दावडी १११, कोयना १०० मिलिमीटर पाऊस झाला.

असाच पाऊस राहिल्यास धरणांतील पाणीपातळी आणखी वाढण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्याने रविवारी (ता. २१) सर्व नद्यांच्या पाण्याची पातळी वाढत आहे.

दुपारी एकपर्यंत पंचगंगा नदीची पातळी राजाराम बंधाऱ्याजवळ ३७ फूट १ इंच इतकी होती. जिल्ह्यातील ७४ बंधारे पाण्याखाली होते. जिल्ह्यातील बहुतांश नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. दरम्यान, कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाचा जोर कायम आहे.

धरणाच्या पाणीसाठ्यात ३.६६ टीएमसीने वाढ झाली असून, धरणाच्या पाणीसाठ्याने ५१ टक्के क्षमता पूर्ण केली आहे. धरणाचा एकूण पाणीसाठा ५४.४२ टीएमसी झाला असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत धरण पाणलोट क्षेत्रात सरासरी पाऊस जास्त आहे.

पुणे जिल्ह्यातील मुळशी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सर्वाधिक ११४ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे धरणातील पाणीपातळीत वेगाने वाढ होत आहे. नाशिक, नगर, सोलापूर जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम सरी बरसत आहेत. खानदेशात तुरळक ठिकाणी हलका पाऊस आहे.

Dam Water Storage
Heavy Rain : पावसाचा रुद्रावतार! सर्व यंत्रणांना सतर्क रहाण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश; पंचगंगा, वारणा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळी वाढ, चंद्रपुरात अंधारी नदीला पूर

कोकणातील धरणे ७० टक्क्यांपर्यंत भरली

कोकणात मागील काही दिवसांपासून धुवाधार पाऊस पडत आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत अतिवृष्टीसदृश पाऊस होत असून, अनेक मंडलांत १०० मिलिमीटरहून अधिक पाऊस आहे. त्यामुळे कोकणातील धरणांतील पाणीपातळी ही ५० टक्क्यांहून अधिक झाली आहे.

तानसा धरणांत ८० टक्के, तिल्लारी ८५ टक्के, मोडकसागर ६० टक्के, विहार ७१, तुलसी १००, धामणी ५३ टक्के पाणीसाठा झाला आहे. इतर धरणांतही पाणीसाठा हा ५० टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. अजूनही अनेक नद्या दुथडी भरून वाहत असल्याने धरणांतील पाणीपातळी वेगाने वाढत आहे.

मराठवाड्यात जोरदार पावसाची प्रतीक्षा

मराठवाड्यात पावसाचा जोर कमीअधिक होत आहे. लातूर आणि नांदेड जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. तर उर्वरित भागात तुरळक सरी पडल्या असून जोरदार पाऊस नसल्याने अजूनही धरणांतील पाणीपातळी पाहिजे तेवढी वाढलेली नाही.

जायकवाडी, माजलगाव, उर्ध्व पैनगंगा या धरणक्षेत्रात बऱ्यापैकी पाऊस झाला आहे. परंतु या धरणांत आवक सुरू झाली असली तरी जास्त प्रमाणात आवक नसल्याने पाणी पातळीत फारशी वाढलेली नाही. त्यासाठी अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा लागून आहे.

Dam Water Storage
Rain Update : खानदेशात पाऊस सुरूच

विदर्भातील धरणांत किंचित वाढ :

पाच दिवसांपासून विदर्भाच्या पूर्व भागांत जोरदार पाऊस पडत आहे. भंडारा, गोंदिया, नागपूर, गडचिरोली, वर्धा जिल्ह्यांत जोरदार पाऊस पडत आहे. गडचिरोली मंडलात २१२.५, तर पोरळा १६३.५, येवळी १९७ मिलिमीटर पाऊस पडला.

त्यामुळे विदर्भातील नळगंगा, बेंबळा, पूस, कामठी खैरी, निम्न वर्धा, गोसी खुर्द अशा महत्त्वाच्या धरणांतील पाणी पातळीत किंचित वाढ झाली आहे. कामठी खैरी धरणांतील पाणीसाठा हा ८२ टक्के, तर तोतलाडोह ६१ टक्के, इटियाडोह ५२, सिरपूर ५० टक्के साठा झाला आहे. या धरणांत गेल्या वर्षीपेक्षा काही प्रमाणात अधिक पाणीसाठा झाला आहे.

येथे झाला १०० मिलिमीटरहून अधिक पाऊस :

अंगाव ११४, महाड १६३.३, करंजवडी १२६.३, नाटे १४५.८, खारवली ११९.५, तुडील १४५.८, गोरेगाव, लोणेरे १३५.३, पोलादपूर ११४.८, कोंडवी ११७.३, नंदगाव १२१, श्रीवर्धन ११९, वालवटी १०१.५, बोरलीपंचटण ११७, म्हसळा ११८.५, खामगाव १०४, वाकवली १००, खेड १००, भरणे १०४, मंडणगड १७९, म्हाप्रळ, देव्हारे १२०, रत्नागिरी, खेडशी, फसोप १४४.८, कोतवडे ११८, मालगुंड ११३, टरवल १४७, पाली ११९, फुणगुस ११२, आंगवली १५३.५, कोंडगाव १३९, देवळे १४९.५, देवरुख १३८.५, तुळसानी १२२, माभळ ११२.५, भांबेड १३८.५, पुनस १२५, बोयसर १४८.८, वेल्हा ११२, लामज १२७.५, आंबा १३४, महाबळेश्‍वर १३३.५, विजय गोपाल, भिडी १०२.३, शिंदी १२०, सेवाग्राम १२४.५, खांढळी ११६, खापरी, बोरी १३३, सोनगाव १४३, कामठी १२२.५, हिंगणा, वानाडोंगरी १०४, गुमगाव १६६, टकलघाट १३३, नागरधन १२०.८, रामटेक १४७, आमडी १२३, पारशिवणी १११, नावेगाव ११६.८, खाट १०९.८, कोडामेंडी १०९.८, बडेगाव १०७.५, पाचगाव १२२ केंद्री १३३, मूल १६४, बेंबळ १७२.५, चिखली १५५.५, खांबडा १३६, मांगळी १३९, मासाळ १०८.८, नावरगाव १३८.८, शिंदेवाही १५१, मोहाली १४०, सावळी, विहाड १७७.८, पाथरी १६७.५, पोंभुर्णा ११४.८, चामोर्शी १५७.५, भामरागड ११५.

रविवारी (ता. २१) सकाळी आठ वाजेपर्यंत झालेला मंडलनिहाय पाऊस, मिलिमीटर (स्रोत ः कृषी विभाग)

कोकण : ठाणे ७१.८, मुंब्रा ७१.८, दहीसर, बेलापूर, अप्पर कल्याण ७२.३, डिघशी ७७.३, उल्हासनगर, कुमभर्ली, अंबरनाथ ७४.८, बिरवडी ८९.५, माणगाव ९५, इंदापूर ९६.५, निजामपूर ९६.५, रोहा ८३.५, चानेरा ८३, वाकण ९७, मुरूड ९८.८, तळा ७९.५, चिपळूण ८२.३, खेर्डी ९३.८, मार्गताम्हाणे ८१.३, सावर्डे ८७.८, दापोली, बुरोंडी, दाभोळ ९१.५, पालगड ९८.८, वेळवी ९१.५, शिर्शी ८४.५, आंबवली, कुळवंडी ९६.८, दाभीळ ८४.५, धामणंद ९३.८, हेदवी ९९, मुरडव ८०.५, राजापूर ८४.५, सौंदळ ९२.५, कुंभवडे ८२.८, ओणी ८५.८, लांजा ९९.५, सावंतवाडी, बांदा ९७.३, आजगाव ८४, मडूरा ९७.३, वेतोरे ८०, कणकवली ८४.३, सांगवे ८४.३, वैभववाडी ८६.३, पालघर ९१.५.

मध्य महाराष्ट्र : इगतपुरी ५५.८, केळघर ५८, हेळवाक ५०, तापोळा ५९.३, चरण ५०.५, करंजफेन ६०, मलकापूर ६६, राधानगरी ५१, कडगाव ५१.३.

मराठवाडा : उदगीर ३२, मोघा ३९, हेर ३१.८, बिलोली ४१.३, कुंडलवाडी ५७.३, अदमपूर ४३, मरखेल ४८.३, हनेगाव ४१, नारंगळ ४६.३, इस्लापूर ४०.३, जलधारा ५८, शिवणी ४१.५, सिरजखोड ६३.८.

विदर्भ : बाभुळगाव ७१, वणी ६९.८, घारफळ ६०.५, कळंब ६५, कोठा ६७, सावरगाव ६३, मेटिखेडा ७०, वणी ८०.८, राजूर ६८.८, भलार ८०.८, पुनवट ८५.५, शिंदोळा ७४, कायार ९६, रसा ९३, शिरपूर ८५.५, मारेगाव, मार्डी, कुंभा ७९, वानोजा ६०, झरी, खडकडोह, मथार्जून, शिबला ८६, झाडगाव, धानोरा, वाढोणा ८४, सिल्लोड ७६, वायगाव ९४.५, तळेगाव ७४.८, सेलू ८०, हिंगणी ७३.५, केळझर ८९, देवळी ९८, पुलगाव ९०, अंदोरी ७९.८, गिरोली ८४.५, हिंगणघाट, वाघोली ७९, सावळी ९२, पोन्हा ८१, समुद्रपूर, जाम ९२, निंदोरी, कोरा ८०, वायगाव ८१.८, मंडगाव ९३.८, पार्डी ८३, हुडकेश्‍वर ८३, कोरडी ८२, दिघोरी ८३, कान्होलीबारा ९६.८, कान्हान ९६.८, निमखेडा १०२, मौदा ८२.५, चाचेर ९८.८, केळवड ८४, तेलकामठी ८४, बेला ९४.५, शिवरा ९१, मिटेवणी ८८, काट्टीपूर ९२.३, आमगाव ७१.८, चिंचगड ८६.३, महागाव, केशोरी, घोथनगाव ७४.५, घुगस ८५.३, तेमुर्डा ८९.३, भद्रावती ९५.५, तालोधी ८९.५, अरमोरी ९८, देऊळगाव ८१.५, वैरागड ८१.३, कुंघाडा ८०.५, असारळी ८५, तरडगाव ९४.५.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com