Pune Rain Update : मुळशी धरण क्षेत्रात ११४ मिलिमीटर पाऊस

Rain News : या महिन्यात धरणक्षेत्रात जोरदार पाऊस पडत आहे. घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम आहे.
Mulshi Dam
Mulshi DamAgrowon
Published on
Updated on

Pune News : या महिन्यात धरणक्षेत्रात जोरदार पाऊस पडत आहे. घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम आहे. मुळशी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात रविवारी (ता. २१) सर्वाधिक ११४ मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळे धरणातील पाणीपातळी वेगाने वाढत आहे.

पुणे जिल्ह्यातील बहुतांश भागात जोरदार पाऊस पडत आहे. पश्‍चिम भागात मुसळधार पाऊस बरसत आहे. यामुळे भात खाचरे भरून वाहत आहेत. अनेक खाचरे तुडुंब भरली आहेत. पाऊस उघडीप देत नसल्याने भात लागवडी काही प्रमाणात खोळंबल्याची स्थिती आहे.

Mulshi Dam
Rain Update : मुळशी धरणक्षेत्रात १२७ मिलिमीटर पाऊस

पूर्व भागात पावसाचा जोर कमी आहे. त्यामुळे खरिपातील पिकांसाठी हा पाऊस पोषक असल्याने पिकांची वाढ जोमदार आहे. परंतु दहा ते पंधरा दिवसांपासून सूर्यदर्शन न झाल्याने काही प्रमाणात पिकांवर रोग-किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

रविवारी मुळशी या घाटमाथ्यावर सर्वाधिक पाऊस पडला. तर लोणावळा घाटमाथ्यावर ५४ मिलिमीटर, वळवण ४७, ठोकरवाडी २२, शिरोटा २८, कुंडली ३०, नीरा देवघर धरणक्षेत्रात ५२, टेमघर ४६, गुंजवणी ३७, वडिवळे २४, वरसगाव १८, पानशेत १७, पवना, तर कासारसाई भागात १४ मिलिमीटर पाऊस झाला. खडकवासला, कळमोडी, चासकमान, भामा आसखेड, आंध्रा, नाझरे, पिंपळगाव जोगे, माणिकडोह, वडज, डिंभे, चिल्हेवाडी, उजनी धरण क्षेत्रात तुरळक सरी पडल्या.

Mulshi Dam
Maharashtra Rain : विदर्भ, दक्षिण महाराष्ट्रासह कोकणात धो-धो पाऊस

मुठा खोऱ्यातील धरणांत रविवारी (ता.२१) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत ०.७७ टीएमसी, तर नीरा खोऱ्यातील धरणांत १.५६ टीएमसी, कुकडी खोऱ्यातील धरणांत ०.३२ मिलिमीटर पाऊस पडला. भीमा खोऱ्यातील २६ धरणांमध्ये ५३.६३ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. तर एक जूनपासून ते आत्तापर्यंत नव्याने ६९.८० टीएमसी येवा दाखल झाला आहे.

एक जूनपासून आत्तापर्यंतचा पाऊस (मिमी)

टेमघर १३५९, वरसगाव ७९०, पानशेत ७८८, खडकवासला २८४, पवना ८९३, कासारसाई ३७५, कळमोडी ४४६, चासकमान ३३१, भामा आसखेड ३१५, आंध्रा ३९७, वडिवळे १०६५, नाझरे २७७, गुंजवणी ९५२, भाटघर ३४७, नीरा देवघर ६९२, वीर १८३, पिंपळगाव जोगे १८७, माणिकडोह २०७, येडगाव २५७, वडज १७३, डिंभे ३०६, चिल्हेवाडी २११, घोड २५४, विसापूर १२९, उजनी २५१, मुळशी २१८३.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com