Congress BJP Agrowon
ॲग्रो विशेष

Nagpur Assembly Constituency : शिवसेना ठाकरे गटाला नागपूरध्ये एकही जागा नाही; काँग्रेस सर्व सहा मतदार संघांत लढणार

Maharashtra Assembly Election 2024 : महाविकास आघाडीत नागपूरच्या जागावाटपावरून मोठ्या घडामोडी घडल्या. दक्षिण काँग्रेसच लढणार असल्याचे सांगण्यात आले.

Team Agrowon

Nagpur News : शहरातील दक्षिण नागपूर विधानसभा मतदार संघावरून महाविकास आघाडीचे घोडे अडले होते. ही जागा सोडणार नाही असा इशारा उद्धव ठाकरे सेना आणि काँग्रेस यांनी एकमेकांना दिला.

मात्र आघाडी तुटण्याची शक्यता निर्माण झाल्याने ठाकरे सेनेने माघार घेतली. आता नागपूर शहरात काँग्रेस सर्व सहा मतदार संघांत लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

महाविकास आघाडीत नागपूरच्या जागावाटपावरून मोठ्या घडामोडी घडल्या. दक्षिण काँग्रेसच लढणार असल्याचे सांगण्यात आले.

त्यामुळे दक्षिणेतील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. आता महाविकास आघाडीमध्ये नागपूर ग्रामीणमधील रामटेक विधानसभा मतदार संघाचा वाद सुरू आहे.

ही जागा उद्धव ठाकरे सेनेला मिळण्याची दाट शक्यता आहे. असे असले तरी काँग्रेसने अद्याप या जागेवरचा दावा सोडलेला नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

CJP Protest: तरुणांच्या आंदोलनाची धग वाढली, देशभरातून पाठिंबा, सरकारकडून चर्चेची तयारी, पण 'सीजेपी'ने ठेवल्या अटी

Agrowon Podcast: सोयाबीन दरात चढ-उतार, हरभरा आवक स्थिर, टोमॅटो भाव कायम,शेपू दबावातच तर मोसंबी दरात नरमाई

Government Schemes Planning: योजनांच्या लाभासाठी सक्षम प्रकल्प आराखडा महत्त्वाचा : अनिसा महाबळे

Tomato Mar Rog: टोमॅटो पिकातील जिवाणूजन्य मर रोगाची लक्षणे आणि उपाय काय?

Buldhana DCC Bank Election: बुलडाणा जिल्हा बँकेची निवडणूक ठरणार लक्षवेधी

SCROLL FOR NEXT