Cashew Nuts  Agrowon
ॲग्रो विशेष

Cashew Nuts : निश्‍चित करा काजू बी किंमत

Cashew Season : काजू हंगाम पुढील एक-दोन महिन्यांत सुरू होणार असून, तत्पूर्वी कृषी विद्यापीठाने सद्यःस्थितीचा बारकाईने अभ्यास करून काजू उत्पादन किंमत निश्‍चित करावी, अशी मागणी फळबागायतदार संघाने विद्यापीठाकडे केली आहे.

एकनाथ पवार / ॲग्रोवन वृत्तसेवा

Sindhudurg News : काजू हंगाम पुढील एक-दोन महिन्यांत सुरू होणार असून, तत्पूर्वी कृषी विद्यापीठाने सद्यःस्थितीचा बारकाईने अभ्यास करून काजू उत्पादन किंमत निश्‍चित करावी, अशी मागणी फळबागायतदार संघाने विद्यापीठाकडे केली आहे.

पुढील दोन महिन्यांत या वर्षीचा काजू हंगाम सुरू होणार आहे. गेल्या काही वर्षांत काजू बीला अपेक्षित दर न मिळाल्यामुळे काजू बागायतदार अडचणीत आले आहेत. उत्पादन खर्चाइतका देखील दर मिळत नसल्यामुळे अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. काजूगर विविध कीड-रोगांचा प्रादुर्भाव सतत होत असतो.

त्या नियत्रंणाकरिता कीटकनाशकांची फवारणी करावी लागते. याशिवाय रासायनिक, सेंद्रिय खते झाडांना शेतकरी देतात. याशिवाय काजू बागांच्या व्यवस्थापनावर मोठा खर्च येतो. या सर्वांचे सर्व्हेक्षण करण्यात यावे. सध्या काजू उत्पादकांना मिळत असलेला दर हा उत्पादन खर्चापेक्षा कमी आहे.

त्यामुळे काजू बागायतदारांना उत्पादन खर्चाच्या तुलनेत दर मिळावा याकरिता उत्पादन किंमत निश्चित होणे आवश्यक आहे. त्यामुळे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या वेंगुर्ले येथील फळसंशोधन केंद्राने या वर्षीचा हंगाम सुरू होण्यापूर्वी उत्पादन किंमत निश्‍चित करावी. त्यांच्या सर्व्हेक्षणानुसार काजू बोर्डाकडे दर निश्‍चित करण्यासाठी मागणी करण्यात येणार आहे.

या वर्षीचा काजू हंगाम सुरू होण्यापूर्वी काजू बी दर निश्‍चित करण्यात यावा, अशी मागणी आम्ही काजू मंडळाकडे केली आहे. त्या अनुषंगाने विद्यापीठाचा उत्पादन किंमत अहवाल आवश्यक आहे. गेल्या वर्षी १३५ रुपये दर होता. परंतु तो प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मिळालेला नाही. त्यामुळे आम्ही आतापासूनच सर्व विभागांशी संपर्क साधत आहोत.
संजय देसाई, अध्यक्ष, फळबागायतदार संघ, दोडामार्ग

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean MSP : हमीदर ५३२८ रुपयांचा खरेदी केली केवळ ५०० रुपये क्‍विंटलने

Agrowon Diwali Article: स्त्रियांची शाश्‍वत शेती

Soybean Farmer Crisis: शेतकऱ्यांचे प्रतिक्विंटलमागे २ हजारांचे नुकसान, सोयाबीनला ६ हजार भाव कधी मिळणार?; काँग्रेसचा सवाल

Ahilyanagar News: कोरोना काळात चुकीचे उपचार केल्याने मृत्यू, पाच डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

Agriculture Mulching: शेतीमध्ये आच्छादनाचा वापर करुन थांबवा मातीची धूप

SCROLL FOR NEXT