Fruit Crop Insurance : आंबा, काजू बागायतदारांना पीकविमा परतावा मिळण्यास सुरुवात

Crop Insurance Scheme : बहुप्रतिक्षेनंतर सिंधुदुर्गातील आंबा, काजू बागायतदारांच्या खात्यात पीकविमा परतावा जमा होण्यास सोमवारपासून (ता. २१) सुरुवात झाली आहे.
Mango and Cashew
Mango and CashewAgrowon
Published on
Updated on

Sindhudurg News : बहुप्रतिक्षेनंतर सिंधुदुर्गातील आंबा, काजू बागायतदारांच्या खात्यात पीकविमा परतावा जमा होण्यास सोमवारपासून (ता. २१) सुरुवात झाली आहे. दरम्यान पीक परताव्यातून वगळलेल्या ९ मंडलांना देखील परतावा मिळणार आहे. परताव्याच्या रकमेत एक कोटीने वाढ झाली आहे.

हवामानावर आधारित पीकविमा योजनेत सिंधुदुर्गातील आंबा आणि काजू पिकांचा समावेश आहे. आंबा पिकाखालील १४ हजार ६६८ हेक्टर क्षेत्र तर काजू पिकाखालील ५ हजार २४३ हेक्टर क्षेत्र असे एकूण १९ हजार ९११ हेक्टर क्षेत्र संरक्षित करण्यात आले.

Mango and Cashew
Fruit Crop Insurance Issue : फळपीक विमा योजनेत बोगस अर्जांचे ‘पीक’

या योजनेत जिल्ह्यातील ४२ हजार १९० शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. गेल्या महिना-दीड महिन्यापासून सातत्याने पीकविमा परतावा मिळावा यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू होते. दरम्यान पीकविमा कंपनीने सुरुवातीला ५७ पैकी ५६ मंडलांतील आंबा पिकाला आणि ४६ मंडलांतील काजू पिकाला ६७ कोटी ९४ लाख ३ हजार ४८० रुपये पीकविमा परतावा मंजूर केला होता.

Mango and Cashew
Fruit Crop Insurance : पंचनामा फळपीक विम्याचा!

त्यानंतर काजूपिकाकरिता वगळलेल्या १० पैकी ९ मंडलांमध्ये स्वंयचलित केंद्रे नसल्यामुळे या मंडलांतील शेतकऱ्यांना नजीकच्या मंडलांतील नोंदीप्रमाणे परतावा मिळावा याकरिता कृषी विभागाचे प्रयत्न सुरू होते. आता ९ मंडलांना परतावा मिळणार आहे. त्यामुळे पीक परताव्याच्या रकमेत १ कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

दरम्यान सोमवारपासून सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीकविमा परताव्याची रक्कम जमा होऊ लागली आहे. काही तालुक्यांतील शेतकऱ्यांना काजू पीक परतावा मिळाला आहे. तर काही शेतकऱ्यांना आंबा पीक परतावा मिळाला आहे. पुढील चार-पाच दिवसांत परतावा जमा होण्याची प्रकिया सुरू राहणार आहे.

जिल्ह्यातील आंबा, काजू बागायतदारांना पीकविमा परतावा सोमवारपासून (ता. २१) मिळण्यास सुरुवात झाली आहे. काजू पिकासाठी वगळलेल्या मंडलांना देखील परतावा मिळत आहे.
- अरुण नातू, तांत्रिक अधिकारी, जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय, सिंधुदुर्ग

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Agrowon
agrowon.esakal.com