Sugarcane Season  Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Season : ऊस गाळप हंगामाची सांगता

Sugarcane Production : सातारा जिल्ह्यातील ऊस हंगाम गाळपाची सांगता झाली आहे. या हंगामात १७ कारखान्यांनी तब्बल एक कोटी ११ लाख ५५ हजार ९९० टन उसाचे गाळप करून एक कोटी नऊ लाख ७६ हजार १९८ क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे.

विकास जाधव : अॅग्रोवन वृत्तसेवा

Satara News : सातारा जिल्ह्यातील ऊस हंगाम गाळपाची सांगता झाली आहे. या हंगामात १७ कारखान्यांनी तब्बल एक कोटी ११ लाख ५५ हजार ९९० टन उसाचे गाळप करून एक कोटी नऊ लाख ७६ हजार १९८ क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे. गाळप व साखर निर्मितीत जरंडेश्‍वर साखर कारखान्याने तर साखर उताऱ्यात अजिंक्यातारा साखर कारखान्याने आघाडी घेतली आहे.

जिल्ह्यातील १७ साखर कारखान्यांचे गाळप नोव्हेंबरमध्ये सुरू झाले. या वेळेस उसाचे प्रमाण कमी असल्याने साखर कारखाने पाच महिने चालले आहेत. पाणीटंचाई व उसाचे क्षेत्र कमी झाले असतानाही जिल्ह्यात साखर निर्मितीत कारखान्यांनी कोटीची उड्डाणाची पंरपरा कायम ठेवली आहे. जिल्ह्यातील १७ कारखान्यांनी एक कोटी ११ लाख ५५ हजार ९९० टन उसाचे गाळप करून एक कोटी नऊ लाख ७६ हजार १९८ क्विंटल साखरेची निर्मिती केली आहेत.

ऊस गाळप हंगाम सुरू झाल्यापासून ऊस क्षेत्र कमी असल्याने गाळप हंगाम लवकरच संपेल व तुलनेत साखर उत्पादनात घट होण्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. यामुळे प्रमुख सर्व कारखान्यांनी कार्यक्षेत्रासह मिळेल तेथून ऊस आणण्यास प्राधान्य दिले जात होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत या हंगामात गाळप करणाऱ्या संख्येत तीन कारखान्यांची भर पडली आहे. ऊस गाळपात व साखर निर्मिती जरंडेश्‍वर शुगर, तर साखर उताऱ्यात अजिंक्यतारा सहकारी कारखाना अव्वल राहिला आहे.

खासगी कारखान्यांनी ५१ लाख ४७ हजार क्विंटल, तर सहकारी साखर कारखान्यांनी ५८ लाख २८ हजार ६१० क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे. साखर उताऱ्यात यावेळेस अजिंक्यतारा साखर कारखान्याने आघाडी घेत १२.४५ टक्के साखर उतारा मिळाला आहे. त्यापाठोपाठ सह्याद्री कारखान्याला १२.२२ टक्के उतारा मिळाला आहे, तर सर्वाधिक १८ लाख ६० हजार २०० टन ऊस गाळपाद्वारे १६ लाख ३४ हजार ४०० क्विंटल साखरेची निर्मिती करून जरंडेश्‍वर कारखान्याने आघाडी घेतली आहे. खासगी कारखान्यांच्या तुलनेत सहकारी साखर कारखान्यांनी साखर उताऱ्यात आघाडी घेतली असून, सरासरी ११.५३ टक्के, तर खासगी कारखान्यांचा सरासरी उतारा ९.४४ टक्के राहिला आहे.

कारखानानिहाय गाळप (टनांत) आणि कंसात साखर निर्मिती (क्विंटलमध्ये)

सहकारी कारखाने : जवाहर श्रीराम कारखाना ४,९५,९९५ (५,६४,६६०), कृष्णा कारखाना १३,४५,४९० (१४,९९,६७०) किसन वीर कारखाना ४,५३,७५९ (५,२१,०४०), देसाई कारखाना २,२४,४१४ (२,६८,७७५), सह्याद्री कारखाना ९,९९,५०० (११,८४,८८०), अजिंक्यतारा कारखाना ७,५५,००० (९,२९,०००) रयत-अथणी ३,६६,४२१ (४,०५,५६०), प्रतापगड कारखाना ३,०१,०५१ (३,४७,३००) खंडाळा कारखाना १,०४,५४६ (१,०७, ७२५) खासगी कारखाने : दत्त इंडिया फलटण ८,६२,९५२ (७,७६,३५०), जरंडेश्वर शुगर १८,६०,२०० (१६,३४,४००), जयवंत शुगर ७,२६,८९० (८,१६,०००), ग्रीन पॉवर शुगर खटाव ३,२२,२५९ (३,५९,७५०), स्वराज्य ग्रीन पॉवर ४,८२,५८४ (४,०२,६६८), शरयू ॲग्रो ४,१३,७९४ (३,३२,४८०), खटाव- माण ॲग्रो पडळ ६,१८,३९९ (६,७०,१४०), शिवनेरी शुगर कोरेगाव १,६८,१३२

(१,५५,९००). (आकडेवारी ७ एप्रिलच्या साखर आयुक्तांच्या अहवालानुसार)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

APMC Chairperson, Vice-Chairperson Allowances: बाजार समिती सभापती, उपसभापतिंच्या मानधनात वाढ

Solar Power Project: सामूहिक सिंचनासाठीचा सौरऊर्जा प्रकल्प आदर्श: वळसे पाटील

Agricultural Issues: शेतीप्रश्न गांभीर्याने घ्या: शरद पवार

Pune Heavy Rainfall: पुणे जिल्ह्यात पावसाचे थैमान

Ahilyanagar Heavy Rainfall: अहिल्यानगरला दुसऱ्या दिवशी अठरा मंडलांत अतिवृष्टी

SCROLL FOR NEXT