Record Break Sugarcane Production : माळरानावर एकरी १२० टन घेतलं उसाचं उत्पादन, कृषी पदवीचा असा केला वापर

Production Per Acre Sugarcane : उसाचे एकरी उत्पादन घेण्यात त्यांनी कागल तालुक्यात विक्रम नोंदविला असून, त्यांचे कौतुक होत आहे.
Sugarcane Production
Sugarcane Productionagrowon

Kolhapur Sugarcane Production : कोल्हापूर जिल्ह्यात अनेक शेतकरी विक्रमी उसाचे उत्पादन घेतात दरम्यान जिल्ह्यातील अनेक शेतकरी मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर एकरी सव्वासे टन उसाचे उत्पादन घेतल्याचे आपण ऐकल आहे. परंतु कागल तालुक्यातील म्हाकवे येथील युवा शेतकरी सतीश ऊर्फ सिद्राम तुकाराम पाटील यांनी माळरानावर एकरी १२० टनापेक्षा जास्त उत्पादन घेत माळरानावरील दगडालाही पाझर फोडल्याचे बोलले जात आहे.

कृषी पदविकाधारक बनल्यानंतर सतीश यांनी नोकरीच्या मागे न लागता घरच्या शेतीकडे लक्ष दिले. उसाचे एकरी उत्पादन घेण्यात त्यांनी कागल तालुक्यात विक्रम नोंदविला असून, त्यांचे कौतुक होत आहे. विशेष म्हणजे यावरच न थांबता आता एकरी १४० टन उत्पादन घेण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे.

शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली तर नोकरीपेक्षाही अधिक उत्पन्न मिळविता येते, याची प्रचिती सतीश यांनी दिली आहे. वाढत्या महागाईमुळे एकरी उत्पादनात वाढ करणे हाच पर्याय असल्याचे पाटील म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, फेब्रुवारी २०२३ मध्ये ट्रॅक्टरच्या एक फाळी पलटीच्या सहाय्याने नांगरट केली. त्यानंतर मे महिन्यात पाच ट्रॉली शेणखत आणि १५ टन कंपोस्ट खत टाकून पुन्हा नांगरट केली. पाच फुटी सरी मारून २ जून २०२३ रोजी पाणी देऊन वाफसा आल्यानंतर कुदळीने दीड फूट अंतरावर को-८६००३२ जातीच्या उसाची एक डोळा पद्धतीने लागण करून पुन्हा पाणी दिले. तीन महिन्यांनंतर भरणी केली.

Sugarcane Production
Sugarcane Season : यंदाचा ऊस गळीत हंगाम लांबला, १५७ कारखान्यांचे धुराडे बंद

यासाठी रासायनिक खतांचे सहा डोस देण्यात आले, तर जीवाणू खते, कीटकनाशके, बुरशीनाशके, सूक्ष्म अन्नद्रव्ये, संजीवके यांच्या वेळोवेळी फवारण्या घेण्यात आल्या. त्यांना विजय मगदूम (सिद्धनाळ), कृषी सहायक ओंकार जाधव, महेश पटेकर, आपण ध्येय निश्चित करूनच शेतीकडे वळलो आहे. कमी क्षेत्रात अधिकाधिक उत्पन्न हेच आता उद्दिष्ट असले पाहिजे. पुढील वर्षासाठी एकरी १४० टन उत्पन्न घेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे.

बंडू जंगटे, केदार माळी याचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. एकरी तीन लाखांचे उत्पन्न मशागत, कम्पोस्ट, शेणखत यांसह रासायनिक खते फवारणीसाठी एकरी एक लाख १५ हजार रुपये खर्च आला आहे, तर खर्च वजा जाता दोन लाख ९३ हजार रुपयांचे निव्वळ उत्पन्न मिळाले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com