Animal Treatment Agrowon
ॲग्रो विशेष

Animal Treatment : दररोज ३०-४० जनावरांवर उपचार बंधनकारक

ZP CEO Vaibhav Waghmare : वाशीम जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यांचा कारभार सुधारण्यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी पुढाकार घेतला आहे.

Team Agrowon

Washim News : वाशीम जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यांचा कारभार सुधारण्यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी पुढाकार घेतला आहे.

जिल्ह्यात कार्यरत सर्व पशुधन विकास अधिकारी आणि संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जून महिन्याअखेर दररोज ३० ते ४० जनावरांवर उपचार करण्याचे आदेशच त्यांनी काढले आहेत.

जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यांची विदारक परिस्थिती असून ती ताळ्यावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. जिल्ह्यामध्ये एकूण ५८ पशुवैद्यकीय दवाखाने आहेत.

या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये पशुधन विकास अधिकारी, सहायक पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक, पट्टीबंधक आणि परिचर अशी आस्थापना कार्यरत आहे.

प्रत्येक दवाखान्यांमध्ये किमान दोन ते तीन व्यक्तींचा स्टाफ कार्यरत असताना बहुतांश वेळा सदर पशुवैद्यकीय दवाखाने बंद अथवा निष्क्रीय असल्याचे चित्र पाहावयास मिळते. या दवाखान्यांमधून कधीकधी एकाही जनावरांची तपासणी व उपचार करण्यात येत नाहीत.

तर कधीकधी दोन ते तीन पशूंवर उपचार करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या या विदारक परिस्थितीची गंभीर दखल वाघमारे यांनी घेतली आहे.

‘पशुपालकांनी जागरूक राहावे’

बहुतांश वेळा पशुवैद्यकीय दवाखाने बंद असल्यामुळे व तेथे पुरेसा कर्मचारी वर्ग उपस्थित नसल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना आपल्या जनावरांवर घरगुती उपचार करावे लागतात. खासगी पशुवैद्यकीय दवाखान्यांची वाट धरावी लागते.

त्यामुळे वाघमारे यांनी जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यांमधील स्थिती सुधारण्याचे प्रयत्न सुरू केले. लोकसभा निवडणूक झाल्यानंतर कधीही आणि कोणत्याही पशुवैद्यकीय दवाखान्याला भेट देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

सकाळी नऊ ते दुपारी साडेचार या वेळेत संबंधित डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी कर्तव्यावर हजर असणे अनिवार्य असल्याचे निर्देश काढले. जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यांवर कार्यरत सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना वर्षभरात तीन उल्लेखनीय कामे करण्याचे निर्देश दिले.

आगामी जून महिन्याअखेर श्रेणी एक दवाखान्याची ओपीडी ४० आणि श्रेणी दोन दवाखान्यांची ओपीडी ३० करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ओपीडीमध्ये दवाखान्यात येणारी जनावरे आणि प्रत्यक्ष दौऱ्यावर जाऊन उपचार करण्यात येणाऱ्या जनावरांचा समावेश आहे.

जिल्ह्यामध्ये एकूण ५८ पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. या दवाखान्यांमध्ये जाऊन शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांची मोफत आणि नियमित तपासणी तथा उपचार करून घ्यावा. तसेच विविध आजाराबाबतच्या तपासण्या करून घ्याव्यात. सदर दवाखान्यांमध्ये अपेक्षित सेवा न मिळाल्यास संबंधित शेतकऱ्यांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे तक्रार करावी.
वैभव वाघमारे (भाप्रसे), मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, वाशीम

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT