IVC Election : केंद्र सरकारकडून भारतीय पशुवैद्यकीय परिषद निवडणुकीची घोषणा

Indian Veterinary Council Election : भारतीय पशुवैद्यकीय परिषदेच्या निवडणुकीची घोषणा झाली आहे. केंद्र सरकारच्या मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाने निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यासाठी ८ जून रोजी मतदान होणार आहे.
Election
ElectionAgrowon

Pune News : देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले आहे. तर आता दुसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या प्रचारास वेग आला आहे. यामुळे देशातील राजकीय वातावरण तापलेले आहे. यादरम्यान केंद्र सरकारच्या मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाने भारतीय पशुवैद्यकीय परिषदेची निवडणूक जाहीर केली आहे. याबाबत मंत्रालयाने शनिवारी (ता. २१) अधिसूचना काढत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. तसेच भारतीय पशुवैद्यकीय परिषदेच्या निवडणूकीसाठी ८ जून रोजी मतदान होणार असून २६ एप्रिलपर्यंत नामांकन करता येईल.

मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार भारतीय पशुवैद्यकीय परिषदेच्या ११ सदस्यांसाठी ही निवडणूक होणार आहे. तसेच दिल्ली उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या रिटर्निंग नोंदणीमध्ये नोंदणी केलेल्या व्यक्तींमधून सदस्यांची निवड करण्यात येणार आहे. यासाठी तारखा निश्चित केल्या असून निवडणूक लढविण्यास पात्र असलेल्या उमेदवारांनी विहित प्रपत्रानुसार नामांकन मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाच्या अधिपत्याखालील पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाच्या निवडणूक अधिकारी, न्यायमूर्ती आशा मेनन (निवृत्त) यांच्याकडे सादर करावे, असे अधिसूचनेत म्हटले आहे.

Election
Kolhapur Loksabha Election 2024 : मंडलिकांच्यानंतर आता पुत्र वीरेंद्रचा हल्लाबोल; थेट साधला छत्रपती घराण्यावर निशाणा 

तसेच भारतीय पशुवैद्यकीय परिषद निवडणुकीसाठी उमेदवारांना त्यांचा उमेदवारी अर्ज ऑनलाइन भरायचा असून तो ई-मेल आयडी: ro.vcielection@gmail.com रिटर्निंग अधिकाऱ्याकडे सबमिट करण्याचा पर्याय आहे. तर उमेदवारी अर्ज जमा करण्याची अंतिम तारीख २६ एप्रिल २०२४ असून सायंकाळी ५ वाजल्यानंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत अशाही सूचना या अधिसूचनेतून देण्यात आल्या आहेत.

तसेच निवडणुकीसाठी उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरताना राजपत्र अधिसूचनांचे पालन करावे लागेल असेही सांगण्यात आले आहे.

कार्यक्रमाची तारीख आणि वेळ

उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख

२० एप्रिल २०२४ ते २६ एप्रिल २०२४ असून सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत

Election
Lok Sabha Election : लोकशाहीच्या उत्सवाला सुरूवात ; महाराष्ट्रात ५ जागांसाठी मतदान

उमेदवारी अर्जाची छाननी

१ मे २०२४ रोजी सकाळी सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत

शेवटची तारीख

उमेदवारांना आपला उमेदवारी अर्ज ३ मे २०२४ पर्यंत घेता येईल ३ मे २०२४ रोजी सायंकाळी ५ पर्यंत यासाठी वेळ असेल

मतदानाचा दिवस

भारतीय पशुवैद्यकीय परिषद निवडणुकीसाठी मतदान ८ जून २०२४ रोजी होणार असून ते सकाळी ७ ते सायंकाळी ७ पर्यंत असेल

मतमोजणीचा दिवस

निवडणूक झाल्यानंतर पुढच्या तीनच दिवसात मतमोजणी होणार असून ती ०९.०६.२०२४ होणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com