Water Crisis Agrowon
ॲग्रो विशेष

Water Crisis : पुण्यात जल संकट; जिल्हाधिकाऱ्यांचे पाणी जपण्यासह सर्व्हिसिंग सेंटर बंद करण्याचे आदेश

Water shortage : राज्याच्या अनेक भागात सध्या जल संकट आले असून पाण्यासाठी सर्वसामान्यांना भटकंती करावी लागत आहे. तर राज्यातील १५८२ गावे आणि ३७३५ वाड्यावस्त्यांना १९१० टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : मागील वर्षी सरासरी पेक्षा कमी पडलेल्या पावसाचा फटका यंदा बसत आहे. अनेक जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठ्यात घट झाली आहे. तर राज्यातील मोठ्या आणि प्रमुख धरणांतील पाणीसाठा मंगळवारी (ता. ०९) ३४.५१ टक्क्यांवर गेल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. यादरम्यान पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला आणि पवना धरणात अनुक्रमे ३६.२० टक्के आणि ३६.४२ टक्के आहे. यामुळे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी पाणी जपून वापरण्यासह पाणी वाचवण्यासाठी उपाय योजना आखण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच जिल्हाधिकारी दिवसे यांनी जिल्ह्यातील पाणीटंचाई पाहता जिल्ह्यातील अनधिकृत सर्व्हिसिंग सेंटर बंद करण्याचे आदेश दिले आहेत. तर गरज पडलयास जिल्ह्यात सुरू असणारी बांधकामे देखील बंद करावीत, असे म्हटले आहे.

गेल्या काही दिवसापासून पुण्यासह राज्याला पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. यामुळे किमान पावसाळा सुरू होऊ पर्यंत खडकवासला आणि पवना धरणातील पाणी वापरता यावे असे नियोजन जिल्हा प्रशासनाकडून केले जात आहे. यादरम्यान जिल्हाधिकारी दिवसे यांनी पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, जिल्ह्यातील नगरपालिकांसह ग्रामपंचायतींना पाणी जपून वापरण्याचे निर्देश दिले आहेत. 

सध्या जिल्ह्यासह राज्यात पाणीटंचाई वाढत आहे. तर पुण्यातील अनेक भागात सध्या स्थिती चिंता जनक नसली तरिही भविष्यात ती बिघडण्याची स्थिती आहे. यामुळे आतापासूनच आम्ही काळजी घेत आहोत. यासाठी वेगवेगळे निर्णय घेतले जात असून आता अनधिकृत कार सर्व्हिसिंग सेंटर बंद करण्यात येतील. यामुळे पुण्यासह ग्रामीण भागातील पाणीटंचाईवर मात करायला मदत मिळेल
- जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

जिल्हाधिकारी दिवसे यांनी जिल्ह्यातील पाणीटंचाईवरून सोमवारी (ता.०८) रोजी पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, जिल्ह्यातील नगरपालिकांसह जलसंपदा विभागाची बैठक घेतली होती. यावेळी त्यांनी पाणीसाठ्याचा आढावा घेताना बारामती, पुरंदर नगरपालिका अधिकाऱ्यांना पाणी वाचवण्यासह अपव्यय टाळण्याच्या सूचना केल्या. तर पाण्याची बचत करण्यासाठी अनधिकृत कार सर्व्हिसिंग सेंटर बंद करा. गरज पडल्यास कारवाई करण्यासह सुरू असणारे बांधकामे थांबवा असे देखील आदेश देण्यात आले आहेत. 

जिल्हा प्रशासन पूर्ण तयार 

जिल्ह्यात जल संकट गडद होत असून भविष्यातील पाणीटंचाईवर जिल्हाप्रशासनाने तयारी केली आहे. सध्या पुणे विभागात ४०७ टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. तर पुण्यातील ७६ गावे आणि ५०० वाड्यावस्त्यांवर ९७ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. सर्वाधिक टँकर हे पुरंदर तालुक्याला लागत असून येथे ५१ टँकर आहेत. यानंतर बारामतीत २१ टँकर पाणीपुरवठा करत आहेत.  

१५ जुलैपर्यंत पाणी

खडकवासला आणि पवना धरणातील पाणीसाठा कमी होत असून तो १५ जुलैपर्यंत कसा वापरता येईल यासाठी जिल्हा प्रशासनाकडून वेळोवेळी आढावा घेतला जात आहे.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Parali Election Update : मुंडे, सत्तार, महाजन, वळसे पाटील आणि विखे पाटील; कोण आघाडीवर कोण पिछाडीवर?

Maharashtra Election : मराठवाडा, विदर्भात भाजपची मुसंडी; सुरुवातीच्या कलांमध्ये महायुतीची आघाडी

Daytime Electricity : शेतीला दिवसा वीज द्या, महावितरणला दिले निवेदन

Maharashtra Election Results 2024 : मुख्यमंत्री शिंदे, फडणीस, अजित पवार, मुंडे आघाडीवर, भुजबळ, दिलीप वळीसे-पाटील पिछाडीवर

Assembly Election Result : कोल्हापुरातून मुश्रीफ, महाडिक आघाडीवर तर सांगलीत जयंत पाटील, विश्वजीत कदम, गाडगीळ यांची आघाडी

SCROLL FOR NEXT