Latur water shortage : लातूर शहराला आता ४ दिवसाआड पाणी; मनपा प्रशासनाचे नियोजन सुरू

Water supply To Latur city : गेल्या काही दिवसापासून उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे धरणातील पाणीसाठा घटत असून यामुळे लातूर शहराला पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. सध्या येथे पाच दिवसाआड पाणीपुरवठा केला जात होता.
Water Shortage
Water Shortage Agrowon

Pune News : गेल्या वर्षी पावसाने मारलेल्या दडीमुळे यंदा राज्यातील अनेक धरणातील पाणीसाठा हा ४० टक्क्यांच्या खाली आला आहे. यामुळे अनेक शहरांसह गाव आणि वाड्यावस्त्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. असाच सामना लातूर शहरावासियांना गेल्या काही दिवसापासून करावा लागत असून येथे ५ दिवसाआड पाणीपुरवठा सुरू होता. आता यात बदल करण्यात येत असून तो ४ दिवसांवर केला जाणार आहे. याचे सध्या नियोजन करण्यात येत असल्याचे मनपा प्रशासनाने म्हटले आहे. 

लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पातील पाणीसाठा घटत चालला आहे. या प्रकल्पात सध्या ६० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा असून यापैकी ११ दशलक्ष घनमीटर जिवंत पाणीसाठा शिल्लक आहे. मांजरा प्रकल्पात सध्या ६.५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर ४७ दशलक्ष घनमीटर मृत पाणी साठा आहे.

Water Shortage
Water shortage : पाणी, चारा टंचाईवर मात करण्यासाठी नाशिक जिल्हा प्रशासनाकडून टंचाई नियंत्रण कक्ष सुरू 

यामुळे गेल्या काही दिवसापासून ८ दिवसातून एकदा पाणीसाठा केला जात होता. तो आता ५ दिवसाआड केला जात आहे. तर आता ४ दिवसांच्या अंतराने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन महापालिका प्रशासनाकडून केले जात आहे. तसेच सध्या उपलब्ध असणारा पाणीसाठा सप्टेंबरपर्यंत वापरता यावा, असेही नियोजन प्रशासनाकडून केले जात आहे

Water Shortage
Water Shortage : राज्यात पाणी टंचाईचे चटके; छ. संभाजी नगरमधील धरणांचा पाणीसाठा २० टक्क्यांवर, टँकरही वाढले
लातूर शहरासह जिल्ह्यातील पाणी पुरवठा हा मोसमी पावसावर अवलंबून आहे. यामुळे धरणातील पाणीासाठ्यावरून पाण्याचे नियोजन करावे लागते. सध्या धरणातील पाणीासाठ्यात घट झाली असून याचे नियोजन केले जात आहे. तर सध्या सुरू असणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या नियोजनात बदल करण्यात येणार आहे. ४ दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे. यामुळे पाणी आल्यानंतर शहरवासियांनी नको तितकी पाण्याची साठवणूक करू नये. पाण्याची अपव्यय टाळावा. 
- विजयकुमार चव्हाण, कार्यकारी अभियंता लातूर मनपा

पाणी वितरणाचे वेळापत्रक 

सध्या शहरासाठी मांजरा प्रकल्पातून पाणीपुरवठा मागणीनुसार पाणी उचल केली जात आहे.  दररोज ५५ ते ६० एमएलडी पाणी उचलले जाते. गेल्या काही दिवसांपासून शनिवार, रविवार, सोमवार, असे ३ दिवस पाणी उचल बंद आहे. यामुळेच येथे पाणीटंचाई जाणवत आहे. तर शहरातील कोणत्या भागात कोणत्या दिवशी पाणीपुरवठा केला जाईल याचे वेळापत्रक जलकुंभावर लावण्यात आले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com