Water Crisis : मराठवाड्यात झपाट्याने वाढते आहे टँकरची संख्या

Water Scarcity : आटणारे जलस्रोत, दिवसेंदिवस खोल खोल चाललेली भूजल पातळी, यामुळे हळूहळू मराठवाड्याची वाटचाल टँकर वाड्याच्या दिशेने चालली आहे.
Water Scarcity
Water Scarcity Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : आटणारे जलस्रोत, दिवसेंदिवस खोल खोल चाललेली भूजल पातळी, यामुळे हळूहळू मराठवाड्याची वाटचाल टँकर वाड्याच्या दिशेने चालली आहे. छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा सर्वाधिक तीव्र असून, या दोन जिल्ह्यांसह इतर जिल्ह्यांमध्ये टँकर बरोबरच विहीर अधिग्रहणातून गाव, वाड्या, वस्त्यांची तहान भागविण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जातो आहे.

Water Scarcity
Water Crisis : ‘पाणीबाणी’वर शाश्‍वत उपाय

मराठवाड्यातील ६३७ गाव व १७८ वाड्यांना सध्या भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. यामध्ये सर्वाधिक झळा छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्याला बसत आहेत. छत्रपती संभाजीनगरमधील २६९ गावे व ४८ वाड्यांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर, पैठण, फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर, वैजापूर, कन्नड आदी तालुक्यांतील गावांचा टंचाईग्रस्त गावांमध्ये प्रामुख्याने समावेश आहे.

जालना जिल्ह्यातील २०१ गावे व ५५ वाड्यांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. बीड जिल्ह्यातील बीड, गेवराई, पाटोदा, आष्टी, परळी, धारूर या तालुक्यामधील १२२ गावे तसेच बीड, गेवराई, शिरूर कासार, धारूर आदी तालुक्यातील ७५ वाड्यांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

Water Scarcity
Water Crisis : पाणीटंचाईने घेतला माय-लेकीचा बळी

लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील सात गावे व अहमदपूरमधील एका गावात पाणीटंचाईचे संकट उभे राहिले आहे. धाराशिव जिल्ह्यातील भूम कळंब धाराशिव उमरगा वाशी लोहारा आधी तालुक्यातील जवळपास ३७ गावांना टंचाईचा सामना करावा लागतो आहे.

टॅंकरच्या पाण्यासाठी ४७१ विहिरींचे अधिग्रहण

पाणीटंचाई निवारण्यासाठी टँकरला पाणीपुरवठा करण्यासाठी ४७१ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. याशिवाय आठही जिल्ह्यात ९०४ विहिरींचे टँकर व्यतिरिक्त पाणीपुरवठ्यासाठी अधिग्रहण करण्यात आले आहे.

जिल्हानिहाय टँकरची संख्या

छत्रपती संभाजीनगर ४४३

जालना ३२१

बीड १४३

लातूर ४

धाराशिव ६३

जिल्हानिहाय अधिग्रहित एकूण विहिरींची संख्या

छत्रपती संभाजीनगर २२६

जालना ३१२

परभणी २०

हिंगोली १७

नांदेड ३३

बीड १४३

लातूर १५२

धाराशिव ४७२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com