Cloudy Weather Agrowon
ॲग्रो विशेष

Cloudy Weather : सिंधुदुर्गात ढगाळ वातावरण कायम

Weather Forecast : सिंधुदुर्ग जिल्ह्यात ढगाळ वातावरण कायम असून, तापमान ३८ अंश सेल्शियसवर पोहोचले आहे.

Team Agrowon

Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्यात ढगाळ वातावरण कायम असून, तापमान ३८ अंश सेल्शियसवर पोहोचले आहे. त्यामुळे अंगाची लाही लाही होत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार सिंधुदुर्गात पावसाचा अंदाज नाही. मात्र कोल्हापूर जिल्ह्याच्या काही भागात विजांच्या गडगडाटांसह पावसाची शक्यता आहे.

त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याच्या लगतच्या सिंधुदुर्गातील गावांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या वाढलेल्या तापमानाचा मोठा परिणाम जिल्ह्यातील फळपिकांवर होणार आहेत. सिंधुदुर्गात सध्या ढगाळ वातावरण आहे. त्यातच तापमान वाढले आहे. याचा मोठा परिणाम जिल्ह्यातील आंबा, काजू, सुपारीसह अन्य पिकांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे.

आंब्यावर काळे डाग पडणे, करपणे, फळगळ होणे, काजूला नव्याने आलेला मोहोर काळा पडणे, काजू बीची वाढ पूर्ण क्षमतेने न होणे असे प्रकार होण्याची अधिक शक्यता असल्याने आंबा, काजू बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

जिल्ह्यात तापमान वाढ झाली असून ढगाळ वातावरण आहे. पुढील दोन दिवस ढगाळ वातावरण कायम राहणार आहे. परंतु सद्यःस्थितीत जिल्ह्यात पावसाची शक्यता नाही. कोल्हापूर जिल्ह्यात काही भागात पावसाचा अंदाज आहे. दरम्यान शनिवारी (ता.२३) मुळदे येथे ३८ अंश सेल्सिअस इतकी नोंद झाली आहे.
डॉ. यशवंत मुठाळ, तांत्रिक अधिकारी, मुळदे संशोधन केंद्र
तापमान ज्यावेळी ३७ किंवा ३८ अंश सेल्सिअस इतके तापमान वाढते त्यावेळी त्याचा दुष्पपरिणाम झाडावर होतो. अशा स्थितीत मोहोर, फळे, पाने यांवर परिणाम होतो. अशा तापमान वाढीत परागीकरण प्रक्रिया देखील होत नाही. काजूचे झाड स्वतःच स्थिरस्थावर राहण्याचा प्रयत्न करीत असते. परिणामी त्याचा उत्पादनावर परिणाम होतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी शक्य असल्यास झाडांना पाणी देणे, झाडाच्या मुळात गवताचे आच्छादन करावे. त्याचा चांगला फायदा होऊ शकेल.
प्रा. विवेक कदम, काजू अभ्यासक, कृषी महाविद्यालय, सांगूळवाडी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bison Gaur Crop Damage: गव्यांच्या उपद्रवामुळे शेती-बागायती संकटात

Water Scarcity: नागपूर जिल्हा होरपळला; १४३ गावांमध्ये पाणीटंचाईची झळ

Waiting For Rain: गडगडाटच अधिक, पावसाचा केवळ शिडकावा

Agrowon Podcast: तूर आणि हिरवी मिरचीच्या दरात चढ-उतार; सोयाबीन व कापूस स्थिर, तर डाळिंबाला २२ हजारांचा भाव

Bori Market: अपर तहसील कार्यालयासाठी बोरी बाजारपेठत कडकडीत बंद

SCROLL FOR NEXT