Cloudy Weather : ढगाळ वातावरणामुळे शेतकरी धास्तावले

Weather Update : गेल्या आठवड्यात हवामान विभागाने पावसाचा अंदाज दिला. त्यानंतर मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात काही प्रमाणात ढगाळ वातावरण तयार होत आहे.
Cloudy Weather
Cloudy Weather Agrowon
Published on
Updated on

Pune News : गेल्या आठवड्यात हवामान विभागाने पावसाचा अंदाज दिला. त्यानंतर मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात काही प्रमाणात ढगाळ वातावरण तयार होत आहे. यामुळे शेतातील विविध पिकांवर विपरित परिणाम होत आहे. त्यातच शुक्रवारी (ता. १) पहाटे पुणे जिल्ह्यातील काही ठिकाणी व शहरात पावसाच्या हलक्या सरी पडल्या. येत्या काळात जिल्ह्यात मोठा पाऊस झाल्यास नुकसान होण्याच्या भीतीने शेतकरी धास्तावले आहे.

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस व गारपीट होत आहे. त्यानंतर गुरुवारी (ता. २९) रात्री पुणे जिल्ह्यातील वातावरणात वेगाने बदल झाले आहे. शुक्रवारी (ता.१) पहाटे पुणे शहरातील काही भागात हलक्या सरी बरसल्या. या पावसामुळे व बदलेल्या वातावरणामुळे शेतकरी चांगलेच अडचणीत येण्याची शक्यता आहे.

Cloudy Weather
Maharashtra Paus Andaj : राज्यातील ५ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; विदर्भ, मराठवाडा, खानदेशात पावसाचा ऑरेंज अलर्ट

सध्या दक्षिण कर्नाटकापासून, कोकम मध्य महाराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्याचा परिणाम जिल्ह्यातील वातावरणावर झाला असून पुणे शहरातील हडपसर, मुंढवा, सुरू, लोहगाव, वाघोली, गोखलेनगर, सदाशिव पेठ, देहू रोड या उपनगरामध्ये हलक्या सरी पडल्या. शिवाजीनगर परिसरात ०.२ मिलिमीटर, पाषाणमध्ये ०.५ मिलिमीटर, कोरेगाव पार्क १.५ मिलिमीटर, एनडीए ०.५ मिलिमीटर पाऊस झाला आहे. यामुळे किमान तापमान १८.३ अंश सेल्सिअसपर्यत खाली आले आहे.

गेल्या महिन्यापासून उन्हाचा चटका वाढत आहे. त्यामुळे पाण्याची टंचाई भासण्यास सुरुवात झाल्याने धरणातील पाण्याची मागणी वाढू लागली होती. त्यातच अनेक ठिकाणी पिके काढणीच्या अवस्थेत आली होती. काही ठिकाणी गहू, हरभरा, ज्वारी अशा पिकांच्या काढणीस सुरुवात झाली होती. मात्र, मागील दोन ते तीन दिवसांपासून वातावरणात अचानक बदल होण्यास सुरुवात झाली.

Cloudy Weather
Paus Andaj : आणखी दोन दिवस पावसाचे; राज्यात ठिकठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज

पुणे जिल्हयात अवकाळी पावसाने हजेरी लावली. तर शुक्रवारी सकाळपासून ढगाळ वातावरणाची स्थिती कायम असल्याने काही ठिकाणी हलक्या सरी पडल्या. यामुळे गहू, मका, हरभरा, द्राक्षे, डाळिंब पिकांचे काही प्रमाणात नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. अगोदरच मागील दोन वर्षांपूर्वी कोरोनामुळे अडचणीत आलेला शेतकरी अवकाळी पावसामुळे चांगलाच संकटाच्या खाईत लोटला जाण्याची शक्यता आहे.

या पिकांचे होऊ शकते नुकसान

- वाढीच्या अवस्थेत असलेला गहू, हरभरा, ज्वारी,
- भाजीपाला पिकांचेही मोठे होऊ शकते
- द्राक्षे, डाळिंब पिकांचेही नुकसान होण्याची भीती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com