PDKV Convocation Agrowon
ॲग्रो विशेष

PDKV Convocation : वातावरण बदलाचे संकट हे संधी माना ः राज्यपाल बैस

PDKV, Akola : ‘पंदेकृविचा’ ३८ वा दीक्षान्त सोहळा संपन्न

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
Akola News : अकोला ः ‘‘वातावरण बदल ही जागतिक समस्या झाली आहे. वाढते तापमान, किडरोगांची वाढ, अशी विविध आव्हाने शेती व शेतकऱ्यांसमोर उभी ठाकली आहेत. हे संकट एक संधी समजून कृषी पदवीधरांनी याविषयी शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करावी. शेतीच्या शिक्षणाचा यासाठी वापर करावा,’’ असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ३८ व्या दीक्षान्त सोहळ्यात ते अध्यक्षपदावरून बोलत होते. कृषिमंत्री धनंजय मुंडे हेही आभासी पद्धतीने सहभागी झाले. व्यासपीठावर कुलगुरू डॉ. शरद गडाख, नवसारी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. झेड. पी. पटेल (गुजरात), परभणीचे कुलगुरू डॉ. इंद्रमणी मिश्रा, राहुरीचे कुलगुरू डॉ. प्रशांत पाटील, ‘माफसू’चे कुलगुरू डॉ. नितीन पाटील, कुलसचिव श्री. राठोड उपस्थित होते.

श्री. बैस म्हणाले, ‘‘ मागील १० वर्षांत शेतीमध्ये चढउतार येत आहेत. शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी केंद्र व राज्य सरकार विविध योजनाही राबवत आहेत. देशात नैसर्गिक शेतीला प्राधान्य दिले जात आहे. आपल्याला मातीचा पोत सुधारण्याकडे लक्ष द्यावे लागेल. चांगले बी-बियाणे, वाण शोधावे लागतील. पाण्याचा काटकसरीने वापर, जलपुनर्भरणाच्या क्षेत्रात काम करण्याची गरज आहे.’’

श्री. मुंडे म्हणाले, ‘‘पदवीधारकांचे काम संपलेले नसून खऱ्या अर्थाने येथून पुढे सुरू झाले आहे. स्वामिनाथन यांच्या कामाचा आदर्श घेत शेतकरी, समाज, देशासाठी काम करावे. बदलत्या वातावरणात टिकाव धरतील असे वाण शेतकऱ्यांना हवे आहेत. कृषी पदवीधरांनी आजवर घेतलेल्या ज्ञानाचा, शिक्षणाचा फायदा आता शेती आणि शेतकऱ्यांना करून द्यावा. कृषी पदवीधरांनी मातीशी नाळ टिकवून ठेवत शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे यावे.’’

डॉ. पटेल म्हणाले, ‘‘ विद्यापीठाने विविध पीकवाण, यंत्र तंत्रांचा शोध लावत शेतकऱ्यांसाठी फायदेशीर काम केले. सध्याही ते सुरू आहे. शिकणे ही आयुष्यभराची प्रक्रिया आहे. पदवी हा शिक्षणाच्या प्रवासातील मैलाचा दगड आहे. व्यावहारिक जीवनात ज्ञानाचा वापर खऱ्या पदवीधरांचे प्रतीक मानले पाहिजे. त्यामुळे या मार्गावर चालण्यासाठी तयार व्हा.’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Wild Vegetables : गावागावांत रानभाजी महोत्सव व्हावा : पाटील

Crop Loan : बँकांनी सर्व कर्जाचे उद्दिष्ट निर्धारित वेळेत पूर्ण करावे

Onion Cultivation : कांदा लागवडीला वेग; क्षेत्र घटण्याची शक्यता

Girna River : गिरणा परिसरातील सर्वच बंधारे तुडुंब

Wildlife Crop Damage : पिकांचे जंगली प्राण्यांपासून संरक्षणासाठी शासन सकारात्मक

SCROLL FOR NEXT