Pune News: सततच्या पावसामुळे यंदा सोयाबीन उत्पादकांना फटका बसला आहे. उत्पादनात सुमारे ३० ते ४० टक्के घट झाली आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्री सुरू केली आहे. मात्र, बाजारभाव नसल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. सोयाबीनला खुल्या बाजारात किमान ५० रुपये प्रति किलो दर मिळावा, अशी मागणी जुन्नर तालुक्यातील उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. .सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे कृषी व महसूल विभागाने पंचनामे करावेत. बाजार समितीने सोयाबीन खरेदी विक्री केंद्र सुरू करावे, अशी मागणी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद खांडगे यांनी केली आहे..Farmer Issue: माझ्या शेतकरी भावा...!.सोयाबीनला ५३२८ रुपये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर करण्यात आला आहे. साडेचार हजार रुपयांवर देखील दर मिळत नाही. त्यात यंदा जुन्नर तालुक्यात या वर्षी सरासरी सुमारे साडेसहाशे मिलिमीटर पाऊस झाला आहे. सोयाबीनच्या शेंगा परिपक्व होण्याच्या अवस्थेत सप्टेंबरमध्ये मुसळधार पाऊस झाला..उभे पीक पाण्यात राहिल्याने काळे पडले आहे. सोयाबीनच्या शेंगाना मोड आले आहेत. पावसाचा जास्त फटका प्रामुख्याने जूनमध्ये पेरणी झालेल्या पिकाला बसला आहे. जुलैमध्ये उशिरा पेरणी झालेल्या नुकसानीचे प्रमाण कमी आहे. जुन्नर तालुक्यात यावर्षी तेरा हजार पाचशे हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची पेरणी झाली होती. शेतीची मशागत, बियाणे, रासायनिक खते, काढणी, मळणी आदींसाठी एकरी सुमारे तीस हजार रुपये खर्च होत आहे..Soybean Price: नव्या सोयाबीनला ४३११ रुपयांचा दर.सोयाबीनचे एकरी उत्पादन १ हजार ३०० किलोग्रॅम (दीड टन) निघणे अपेक्षित असताना एकरी ७०० ते ८०० किलोग्रॅम उत्पादन निघत आहे. सध्या सोयाबीनला प्रति किलोग्रॅम ४० रुपये ते ४१ रुपये बाजारभाव मिळत आहे. सध्याच्या बाजारभावात जेमतेम भांडवली खर्च वसूल होत आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्री सुरू केली आहे. मात्र सोयाबीनला अपेक्षित दर नसल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे..सततचा पाऊस, अतिवृष्टी यामुळे सोयाबीनसह भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. द्राक्षाच्या घडनिर्मितीवर सुद्धा परिणाम झाला आहे. मात्र महसूल व कृषी विभागाने तालुक्याच्या मध्यभागातील नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे केले नाहीत.राजेंद्र वाजगे, शेतकरी, नारायणगाव.सोयाबीन पिकाचे सरसकट पंचनामे केले नाहीत. नुकसान झाले असल्यास शेतकऱ्यांनी आपल्या भागातील तलाठी कार्यालयात माहिती दिल्यास पंचनामे केली जातील. शीतल गर्जे, मंडलाधिकारी, नारायणगाव.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.