Livestock Management: शेतकरी नियोजन । गोपालनशेतकरी : आरती अप्पासो सस्तेगाव : मांडवखडक, ता. फलटण, जि. सातारापशुधन संख्या : ४० गाई.सातारा जिल्ह्यातील मांडवखडक (ता. फलटण) येथील आरती व अप्पासो नामदेव सस्ते हे अल्पभूधारक शेतकरी कुटुंब आहे. कुटुंबाचे २०१४ नंतर विभाजन झाल्यानंतर आरती आणि अप्पासो सस्ते यांच्या वाट्याला केवळ अर्धा एकर शेती व दोन बैल आले. स्वतःकडील काही आणि थोडी वाट्याने शेती घेऊन कुटुंबाचा गाडा सस्ते दांपत्य चालवत होते. शेतीला पूरक म्हणून त्यांनी २०१४ मध्ये सस्ते कुटुंबाने दुग्ध व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला..Dairy Farming Success : दुधाच्या घागरीतून उमललेला आत्मसन्मान.त्यासाठी एक गाय खरेदी केली. वाणिज्य पदवीधर असलेल्या आरतीताईंना जनावरांच्या संगोपनातील कसलाही अनुभव नव्हता. पण त्यांनी जबाबदारी स्वीकारली. खरेदी केलेली गाभण गाय प्रसूतीवेळीच मरण पावली. हा मोठा धक्का होता. पण निराश न होता आपल्याकडील एक बैल विकून दुसरी एच.एफ. गाय खरेदी केली. या गाईची चांगली काळजी घेत त्यांनी व्यवसायाला गती दिली. पुढील तीन चार वर्षे गोठ्यामध्ये पैदाशीवर भर देत गोठ्यातील गाईंची संख्या वाढवीत नेली. टप्प्याटप्प्याने आरतीताईंनी गोपालनातील अनेक बारकावे समजून, शिकून घेतले. आज मुक्तसंचार पद्धतीने गोपालनाचे उत्तम व्यवस्थापन आरती सस्ते करत आहेत..मुक्तसंचार गोठ्याची उभारणीगोपालनातील अभ्यास केल्यानंतर गाईंसाठी मुक्तसंचार गोठा पद्धती फायदेशीर असल्याचे समजले. घरासमोरील जागेतील ४० बाय ४० फूट बंदिस्त गोठ्याचा विस्तार करण्याचे त्यांनी ठरविले. बंदिस्त गोठ्याच्या जागेत १०० बाय ४० फूट आकाराच्या मुक्तसंचार गोठ्याची उभारणी केली. त्यास चारही बाजूंनी तारेचे कुंपण केले. त्यातील काही भाग बंदिस्त व काही मुक्तसंचार या पद्धतीची अशी रचना केली. गाईंना दुपारच्या उन्हात सावली मिळावी, यासाठी गोठ्यामध्ये दोन मोठी झाडे आहेत. --सुरुवातीच्या दोन गाईंनंतर बाहेरून एकही गायी खरेदी न करता संगोपन आणि पैदाशीवर भर दिला. आज गोठ्यामध्ये लहान-मोठ्या मिळून ४० गाई आहेत. गोठ्यातून दोन्ही वेळचे मिळून प्रति दिवस ३५० लिटरपर्यंत दूध उत्पादन मिळते आहे..Dairy Development Project: विदर्भ-मराठवाड्यात ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी दुग्धविकास प्रकल्पाचा दुसरा टप्पा सुरू: नितीन गडकरी.व्यवसायाचे नियोजनसकाळी सहापासूनच गोठ्यातील कामे सुरू होतात. दिवसभर नियोजनानुसार खाद्य, पाणी, दूध काढणे आदी कामे वेळेवर केली जातात.मुक्त गोठ्यातील गाई सकाळी गोठ्यात बांधून दुभत्या जनावरांना साडेतीन किलो, तर कालवडींना अडीच किलो पशुखाद्य दिले जाते. वजन व दूध क्षमतेनुसार खाद्यात वाढ केली जाते.धारा काढण्यापूर्वी गाईची कास स्वच्छ पाण्याने धुतली जाते. जेणेकरून कासेला संसर्ग होणार नाही..दूध काढण्यासाठी मशिनचा वापर केला जातो. दूध काढण्याचे मशीन दररोज गरम पाण्याने धुऊन नंतर त्याचा वापर केला जातो. यामुळे सडांना संसर्गाचा धोका कमी होतो.दूध काढण्यापूर्वी गाईंना हिरवा चारा देऊन नंतर मशिनच्या साह्याने धारा काढल्या जातात. त्यानंतर गाईंना मुक्त संचार गोठ्यात सोडले जाते. गाईंना सकाळी अडीच तास व संध्याकाळी अडीच तास बंदिस्त गोठ्यात बांधले जाते.दर्जेदार आणि पोषक चारा गाईंना उपलब्ध होण्याकरिता अर्धा एकर क्षेत्रात चारा पिकांची लागवड केली आहे. शिवाय आवश्यकतेनुसार चाऱ्याची खरेदी केली जाते. त्यामुळे टंचाईच्या काळात चाऱ्याची कमतरता भासत नाही.बंदिस्त गोठ्यातील शेणखताची दररोज उचले केली जाते. तर मुक्तसंचार गोठ्यातील शेणाची दर दहा दिवसांनी उचल केली जाते..आरोग्य व्यवस्थापनदुग्ध व्यवसायात जनावरांचे आरोग्य चांगले राखणे असेल तरच व्यवसाय यशस्वी होतो. त्यासाठी जनावरांना नियमितपणे विविध संसर्गजन्य आजारांचे प्रतिबंधात्मक लसीकरण केले जाते. त्यात प्रामुख्याने लम्पी त्वचा आजार, लाळ्या खुरकूत, फऱ्या-घटसर्प या आजारांचे लसीकरण प्राधान्याने केले जाते. दर तीन ते सहा महिन्यांनी पशुवैद्यकांच्या सल्ल्यानुसार लसीकरण केले जाते. शिवाय नियमितपणे जंतनिर्मुलन केले जाते. जनावरांचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी आणि दुग्ध उत्पादनामध्ये वाढ मिळविण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळते. मुक्त संचार गोठ्यात गोचीड, डासांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शिफारशीत घटकांची गोठ्यात फवारणी केली जाते. प्रत्येक गाईला टॅगिंग करण्यात आले आहे. त्यामुळे प्रत्येक गाईची वेगळी ओळख राखणे शक्य होते. या माध्यमातून गाईंच्या सर्व नोंदी ठेवणे शक्य होते. यामध्ये गाईंची वंशावळ व पैदाशीच्या महत्त्वाच्या नोंदींचा समावेश असतो..चारा पिकांची लागवडजनावरांना ओला आणि सुका चारा योग्य प्रमाणात दिला जातो. पुरेसा ओला चारा उपलब्ध होण्यासाठी चारा पिकांची लागवड करण्यावर भर दिला आहे. त्यासाठी एकूण क्षेत्रापैकी अर्धा एकरांत मका लागवड केली जाते. त्यामुळे जनावरांना सकस हिरवा चारा पुरेशा प्रमाणात उपलब्ध होतो. चारा टंचाईवर मात करण्यासाठी आवश्यकतेनुसार मुरघास निर्मिती देखील केली जाते. त्यासाठी शेतात चांगल्या वाणाच्या मक्याची लागवड केली जाते. त्यामुळे टंचाईच्या काळात दर्जेदार मुरघास उपलब्ध होतो. खाद्यात मुरघासाचा वापर केल्यामुळे दूध उत्पादनात वाढ मिळण्यास मदत होत असल्याचे श्री. नागरे सांगतात.- आरती सस्ते ८६०५४२५५९५(शब्दांकन : विकास जाधव).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.