PDKV Convocation : ‘दीक्षांत’मध्ये पदवीधारकांचे ‘पदवी विकणे आहे’ आंदोलन

२५ जानेवारीपासून कृषी अभियंत्यांचे चारही कृषी विद्यापीठांत राज्यव्यापी बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे. कृषी अभियंत्यांवर शासनाकडून सतत होणाऱ्या अन्यायाविरुद्ध पुकारलेले हे बंड आहे.
Student Protest
Student ProtestAgrowon

Agriculture Graduates Protest अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात ३७ व्या दीक्षांत समारंभ (PDKV Convocation) झाला. या सोहळ्यात बी. टेक (कृषी अभियांत्रिकी) च्या विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.

दुसरीकडे कृषी अभियांत्रिकीचे विद्यार्थी आपल्या मागण्यांसाठी १२ दिवसांपासून आंदोलन (Agri Student Protest) करीत असून याकडे लक्ष वेधण्यासाठी सोहळ्यानंतर आंदोलकांनी घोषणाबाजी केली. ‘पदवी विकणे आहे,’ (Degree For Sale Protest) आंदोलन केले.

२५ जानेवारीपासून कृषी अभियंत्यांचे चारही कृषी विद्यापीठांत राज्यव्यापी बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे. कृषी अभियंत्यांवर शासनाकडून सतत होणाऱ्या अन्यायाविरुद्ध पुकारलेले हे बंड आहे.

Student Protest
Agri Student Protest : ‘कृषी’च्या विद्यार्थ्यांचा ठिय्या दहाव्या दिवशीही सुरूच

कृषी सेवा परीक्षा २०२१ व २०२२ ला तत्काळ स्थगिती, महाराष्ट्रात स्वतंत्र कृषी अभियांत्रिकी संचालनालय स्थापन करावे, मृदा व जलसंधारण विभागात कृषी अभियांत्रिकी शाखेचा समावेश करावा, राज्यसेवा मुख्य परीक्षेत कृषी अभियांत्रिकी हा वैकल्पिक विषय म्हणून समाविष्ट करावा, अशा त्यांच्या मागण्या आहेत.

Student Protest
PDKV Convocation : विद्यार्थ्यांना ४३२७ पदव्यांचे होणार वितरण ः डॉ. गडाख

गेल्या १२ दिवसांपासून सुरु असलेल्या आंदोलनाची शासन व आयोगाकडून कुठल्याही प्रकारची दखल घेतल्या जात नसल्याने कृषी अभियंत्यांचे अस्तित्व धोक्यात आल्याचे आंदोलक म्हणत आहेत.

त्यामुळेच 'दीक्षांत समारंभात पदवी घेऊन भविष्यात कृषी अभियांत्रिकी ही शाखाच बंद पडते की काय' हा सवाल प्रत्येक पदवीधारकांच्या मनात आहे आणि म्हणूनच पदवी विकण्यासारखे टोकाचे आंदोलन करावे लागत असल्याचे आंदोलकांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com