देशाच्या आत्मनिर्भरतेसाठी कृषी पदवीधरांनी योगदान द्यावे

कुलपती भगतसिंह कोश्यारी यांचे विद्यार्थ्यांना आवाहन
Bhagat singh Koshyari
Bhagat singh Koshyari Agrowon
Published on
Updated on

परभणी ः ‘‘कृषी पदवीधरांनी (Agriculture Graduates) आत्मनिर्भर भारताच्या (Atmnirbhar Bharat) निर्मितीसाठी तसेच देश जगद्‍गुरू होण्यासाठी योगदान द्यावे. अन्नधान्याच्या बाबतीत देशाला स्वावलंबी (Food Grain) करण्यात कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांचे संशोधन कार्य महत्त्वपूर्ण आहे’’, असे प्रतिपादन राज्यपाल, कुलपती भगतसिंह कोश्यारी (Chancellor Bhagat singh Koshyari) यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचा (Vasatrao Naik Marathwada Agriculture University) २४ वा दीक्षान्त समारंभ कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (ता.२२) पार पडला.

Bhagat singh Koshyari
महाराष्ट्रासाठी मंजूरीप्रमाणे खते उपलब्ध व्हावी - कृषिमंत्री दादा भुसे

कोश्‍यारी हे दूरदृश्‍यप्रणालीद्वारे उपस्थित होते. कृषिमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. राजस्थानमधील उदयपूर येथील महाराणा प्रताप कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नरेंद्रसिंह राठौर, स्‍वागताध्‍यक्ष कुलगुरु डॉ. अशोक ढवण, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य आमदार डॉ. राहुल पाटील, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास भाले, डॉ. राजीव मराठे, शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. देवराव देवसरकर, कुलसचिव डॉ. धीरजकुमार कदम, उपकुलसचिव डॉ. गजानन भालेराव आदी उपस्थित होते.

भुसे म्‍हणाले, ‘‘कृषी पदवीधरांनी उत्तम पद्धतीने शेती (Agriculture) केल्यास इतरही शेतकरी चांगली शेती करतील. शेती विषयाचा शालेय अभ्यासक्रमात लवकरच समावेश होईल. झोपडीत राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या समृध्दीसाठी कृषी पदवीधरांसह सर्वांना एकत्र यावे लागेल. बदलत्या हवामान स्थितीत तग धरणाऱ्या पिकांचे वाण विकसित करण्यासाठी कृषी संशोधनाची पुनर्मांडणी करावी लागेल. गेल्या पन्नास वर्षांच्‍या कार्यकाळात परभणी कृषी विद्यापीठाने विविध पिकांचे वाण, यंत्रे, अवजारे विकसित केलेले कृषी तंत्रज्ञान शिफारशी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवल्या पाहिजेत.’’

डॉ. राठौर म्‍हणाले, ‘‘कृषी पदवीधरांनी नोकरी मागण्यापेक्षा स्वतः उद्योजक होऊन रोजगारनिर्मिती करावी. कृषी क्षेत्रातील कुशल मनुष्‍यबळासाठी दर्जेदार शिक्षण देण्याची जबाबदारी कृषी विद्यापीठांची आहे. हवामान बदलांच्या अनुषंगाने संशोधनाचे प्राधान्यक्रम निश्‍चित करावे लागतील.’’

चार हजार २३२ स्‍नातकांना पदवी

कोश्‍यारी यांनी २०२०-२१ वर्षातील विविध विद्याशाखेतील एकूण ४ हजार २३२ स्‍नातकांना विविध पदवीने अनुग्रहित केले. यात विविध विद्याशाखांतील ३ हजार ८४२ स्‍नातकांना पदवी, ३५९ स्‍नातकांना पदव्‍युत्‍तर, तर ४९ स्‍नातकांना आचार्य पदवीने अनुग्रहित केले. सुवर्ण पदक आणि पारितोषिक विजेत्या विद्यार्थ्यांना मान्‍यवरांच्‍या हस्‍ते गौरविण्‍यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com