डॉ. गणेश कोटगिरे, रमेश गायकवाड, डॉ. अशोक कडलगFlood Crop Management: महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या हंगामामध्ये साधारणतः ८ ते १० लाख हेक्टर क्षेत्रावर ऊस उत्पादन घेतले जाते. मागील ३ ते ४ वर्षांतील परिस्थिती पाहता वातावरणात अचानक होणाऱ्या बदलाचा परिणाम ऊस शेतीवर होताना दिसून येत आहे. यावर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यामध्ये जास्त प्रमाणात पाऊस व त्यानंतर जास्त काळ उघडीप राहिली. तसेच सप्टेंबरपासून अतिवृष्टी सदृश पाऊस झाला. यामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे नदीकाठच्या प्रमुख ऊस उत्पादक भागात जिल्ह्यांमध्ये उसाखालील क्षेत्र पाण्याखाली गेले. त्यामुळे पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यासाठी सद्यःस्थितीत पूरग्रस्त परिस्थितीमुळे ऊस पिकाचे होणारे संभाव्य नुकसान जाणून त्यानुसार उपाययोजनांचा अवलंब करणे आवश्यक आहे. .पूरग्रस्त परिस्थितीमुळे ऊस पिकाचे होणारे संभाव्य नुकसानजमिनीतील प्राणवायूची पातळी कमी झाल्यामुळे अन्नद्रव्यांची उपलब्धता कमी होऊन पाने पिवळी पडतात. वाढ खुंटते.मुळांची कार्यक्षमता घटल्याने पाणी व अन्नद्रव्ये शोषण योग्यप्रकारे होत नाही. तसेच बाष्पीभवन व कर्बग्रहण क्रिया मंदावल्याचे दिसून येते.पूर्णतः बुडालेल्या उसाच्या शेंड्यात गाळमिश्रित पाण्याचा शिरकाव झाल्याने उसाचा वाढणारा कोंब कुजतो व पांगश्या फुटतात.एका आठवड्यापेक्षा जास्त काळ ऊस पाण्यात बुडाल्यास पाने वाळतात व ऊस कुजू लागतो.नवीन लागवडीत ७ दिवसांपेक्षा जास्त काळ पाणी राहिल्यास बहुसंख्य डोळ कुजतात. परिणामी उगवण कमी होते.पूरग्रस्त क्षेत्रात प्रवाही पाण्याच्या भागात ऊस लोळण्याचे प्रमाण वाढते.पूरग्रस्त उसामध्ये कीड व रोगांचा प्रार्दुभाव वाढल्याचे दिसून येते..Soil Erosion: जमिनीची धूप थांबविण्यासाठी उपाययोजना.जमिनीवर होणारा परिणामसुपीक मातीची धूपपुराच्या पाण्यामुळे ऊस पिकातील सुपीक मातीची धूप मोठ्या प्रमाणात होते. पुराच्या पाण्याच्या वेग खूप जास्त असतो. ज्यामुळे जमिनीतील मातीचे कण मोकळे होतात. आणि पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून जातात. यामुळे जमिनीच्या पृष्ठभागावर लहान-लहान खडे तयार होतात. त्यामुळे जमीन उंच व सखल तयार होते. अशा वेळी जमिनीवर पिकाचे आच्छादन असल्यास पिकांची मुळे मातीला धरून ठेवतात. त्यामुळे मातीचे कण कमी प्रमाणात पुराच्या पाण्याने वाहून जातात.पुरामुळे सुपीक मातीचा थर वाहून जातो. या थरामध्ये जास्त प्रमाणात सेंद्रिय पदार्थ व सूक्ष्मजीव असतात. त्यामुळे जमिनीची उत्पादकता कमी होते. जमिनीची धूप झाल्यामुळे मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी होते.पुरामुळे जमिनीची संरचना व पोत बिघडते. पुराच्या पाण्यातील गाळ आणि सततच्या पाण्यामुळे मातीच्या संरचनेत बदल होतो. पूर ओसरल्यावर जमीन घट्ट होते. आणि भुपृष्ठावर कठीण थर तयार होतो, त्यामुळे नवीन रोपांच्या वाढीस अडथळा येतो..अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेवर होणारा परिणामजमिनीत पाणी साचल्यामुळे नायट्रोजन, पोटॅशिअम तसेच गंधक मॅग्नेशिअम, ॲल्युमिनिअम विद्राव्य प्रमाणात वाढ होऊन ती वाहून जातात. यामुळे जमिनीतील पोषक घटकांची कमतरता निर्माण होते. मातीत पाणी जिरल्यामुळे हवेची जागा पाणी घेते, त्यामुळे ऑक्सिजनची पातळी कमी होते. मुळांच्या श्वसनात अडथळा येतो आणि पिकाची वाढ खुंटते.प्राणवायूच्या कमतरतेमुळे जमिनीतील पोषण सूक्ष्मद्रव्यांचे चक्र बिघडते. नत्र, स्फुरद व इतर अन्नद्रव्यांचे प्रमाण कमी झाल्यामुळे पिकांची पाने पिवळसर होतात व वाढ खुंटते. मुळांची कार्यक्षमता घटते. त्यामुळे पीक अन्नद्रव्ये व पाणी शोषून घेऊ शकत नाही..पुरामुळे सुपीक मातीचा झालेला ऱ्हास तपासण्यासाठी...जमिनीच्या पृष्ठभागाचे निरीक्षणपूर ओसरल्यानंतर शेतात मातीचा थर साचलेला आहे का हे तपासणे गरजेचे आहे. या थराचा पोत आणि रंग जुन्या मातीपेक्षा वेगळा असू शकतो. बऱ्याचदा गाळामुळे मातीचा पोत चिकणमाती सारखा होतो.शेतातील काही भागामध्ये जमिनीची धूप झाली आहे का याची तपासणी करावी. विशेषतः उताराच्या भागात किंवा पाण्याचा प्रवाह जास्त होता अशा ठिकाणी माती वाहून गेल्याचे स्पष्ट दिसून येते.काही ठिकाणी पुरामध्ये जमिनीवर कठीण थर निर्माण होणे यामुळे पाणी मुरण्यास अडथळा होतो.पूर ओसरल्यानंतर आणि माती पूर्णपणे सुकल्यावर मातीचे नमुने घ्यावेत. माती परिक्षण करून पोषक अन्नद्रव्यांची आणि सेंद्रिय कर्ब प्रमाण तपासणी करावी..अंशत: बुडालेल्या पिकावर पुरामुळे वाहून आलेल्या नदी पात्रातील गाळाचा चांगला परिणाम दिसून येतो. गाळाच्या जमिनीमध्ये नत्र, स्फुरद, पालाश आणि सिलिकॉन या सारखी अन्नद्रव्ये असतात. ही अन्नद्रव्ये पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असतात. त्यामुळे अशा जमिनीचे व पिकाचे नुकसान कमी होऊ शकते.पुराच्या पाण्यात पूर्णत: बुडालेले पीक नदीतील वाहून आलेल्या गाळामुळे खराब झालेले असल्याने ते काढून टाकावे. त्या जमिनीची नांगरणी, कुळवणी करून ओला गाळ जमिनीमध्ये चांगला मिसळून घ्यावा. जेणेकरून त्याचा उपयोग पिकांच्या वाढीसाठी होऊ शकतो.जमिनीची धुप झाल्यामुळे अशा जमिनीमध्ये उंच सखोलपणा निर्माण होतो आणि तो मशागतीने पुर्ववत करता येतो. ज्या ठिकाणी सखोलपणा तयार झाला आहे, तिथे माती आणि कुजलेल्या सेंद्रिय पदार्थांनी तो भरून घ्यावा.पुरामुळे वाहून आलेला २ ते ४ इंचांपर्यंतचा मातीचा थर शेतात हलकी मशागत करून जमिनीत चांगला मिसळून घ्यावा आणि जमीन पूर्ववत करून घ्यावी..Flood Management: अतिवृष्टीनंतर द्राक्षामध्ये करावयाच्या उपाययोजना.पूरग्रस्त ऊस सुधारण्याकरिता करावयाच्या उपाययोजनाअंशतः पाण्याखाली बुडालेल्या उसामध्ये खालील उपाययोजना केल्यास फायदेशीर ठरते.ज्या ठिकाणी ऊस ८ ते १० दिवसांपेक्षा जास्त काळ पाण्याखाली बुडून कुजला असेल अशा ठिकाणी वाफसा आल्यानंतर शेतातील ऊस काढून घ्यावा. त्याचा कंपोस्ट करण्यासाठी वापर करता येतो. त्यानंतर जमिनीची नांगरट करून हंगामनिहाय फेरपालटीचे पीक म्हणून हिरवळीचे पिके जसे ताग, धैंचा याचबरोबर गहू, हरभरा, मका इत्यादी पिके घेऊन त्यानंतर ऊस लागवड करावी.अंशतः बुडालेल्या उसातील पाण्याचा निचरा होण्याकरिता उताराच्या बाजूने चर काढावेत. किंवा शेतातील पाणी पंपाच्या साह्याने शेताबाहेर काढून घ्यावे.अंशतः बुडालेल्या उसाची वाळलेली व कुजलेली पाने काढून टाकावीत. जेणेकरून हवा खेळती राहील.ज्या ठिकाणी ऊस अंशतः वाढलेला आहे. परंतु, गाळमिश्रित पाणी पोंग्यामध्ये गेल्यामुळे पोंगा कुजून वाढ खुंटली आहे, अशा पिकाची खोडवा घ्यावा. त्यासाठी जमिनीलगत छाटणी करावी. खोडवा मशागतीची कामे करून कीडनाशक व बुरशीनाशकांच्या फवारण्यांसोबतच संतुलित खताचा वापर करून त्वरित हलकी भरणी करावी. एक नांग्या भरण्याचे काम करून घ्यावे..पूरग्रस्त शेतातील उसाची वाढ पुन्हा चांगल्याप्रकारे होण्यासाठी हेक्टरी ६० किलो नत्र (११० किलो युरिया), ४० किलो पालाश (६६ किलो म्युरेट ऑफ पोटॅश) व १२.५ किलो मायक्रोसोलचा वापर करावा.नत्र स्थिर करणाऱ्या व स्फुरद विरघळविणाऱ्या जिवाणूचा हेक्टरी २.५ लिटर या प्रमाणात वापर केल्यास फायदेशीर ठरते.उसाच्या पानांवरील तांबेरा, पोक्का बोंग व तपकिरी ठिपके या रोगाच्या नियंत्रणाकरिता मॅन्कोझेब ३ ग्रॅम प्रति लिटर पाणी या बुरशीनाशकाचा वापर करावा.नत्र खताची मात्रा अमोनिअम सल्फेटच्या स्वरूपात किंवा मिश्र खत स्वरूपात दिल्यास त्याचा फायदा होतो.पूर ओसरल्यानंतर शेतातील कुजलेला ऊस शेताबाहेर काढून उभी व आडवी नांगरणी करावी. जेणेकरून हुमणी अळीच्या अवस्था नष्ट होतील..पाणी ओसरल्यानंतर पॉली ट्रे मधील प्लास्टिक पिशवीतील किंवा पॉली बॅगमधील रोपांचा वापर करून तूट भरून काढावी.अति पाण्याची किंवा पूर परिस्थिती प्रत्येक वर्षी उद्भवणाऱ्या ठिकाणी जास्त बेण्याचा वापर करावा. हेक्टरी साधारणपणे १ लाख किंवा त्यापेक्षा जास्त गाळपाचा ऊस लोळण्यास प्रतिबंध होतो.ऊस अति पाण्यात जास्त दिवस राहिल्यास लवकर पक्व होतो. त्यामुळे तोडणी कार्यक्रमास अशा उसाची तोडणी अग्रक्रमाने करायला हवी.२० ते २५ कांड्यावर असलेल्या पूरबाधित उसाला वाफसा येताच लवकर गाळपास पाठवावा.मोठ्या बांधणीच्या आतील वयाचा ऊस पूर्णपणे पाण्याखाली जाऊन कुजून गेला असल्यास वाफसा आल्यावर जमिनीलगत तोडणी करून त्याचा सरीमध्ये कंपोस्ट खत करण्यासाठी वापर करावा.ऊस तोडणीनंतर बुडख्यांवर १ ग्रॅम कार्बेन्डाझिम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.पूर रेषेतील क्षेत्रात ऊस लागण करताना को ८६०३२ आणि कोएम ०२६५ या वाणाची निवड करावी.जास्त प्रमाणात व जास्त दिवस पावसाचे पाणी साचून शेतात राहिल्यास नत्राचा ऱ्हास होतो. परिणामी उसाच्या राखीव वाढीस मर्यादा येतात. असा ऊस प्रत्यक्ष गाळपनिहाय घ्यावा..पूरग्रस्त पिकांमध्ये अन्नद्रव्यांचा वापरपूरग्रस्त शेतातील अन्नद्रव्यांचा ऱ्हास होते. त्यामुळे ऊस पिकाची पुढील काळात चांगली वाढ होण्यासाठी हेक्टरी ६० किलो नत्र (१३० किलो युरिया), ४० किलो पालाश (७५ किलो म्युरेट ऑफ पोटॅश) व मायक्रोसोल १२.५ किलो याप्रमाणे मात्रा द्यावी.शेतातील पाण्याचा निचरा होण्यास वेळ लागल्यास अशा उसावर द्रवरूप रासायनिक खतांची फवारणी करावी. मल्टिमॅक्रोन्युर्टियंट या द्रवरूप खताची फवारणी प्रत्येकी २.५ लिटर अधिक वसंत ऊर्जा जैवसंजीवक १ लिटर प्रति २०० लिटर पाण्यामध्ये मिसळून पानांवर फवारणी करावी.तसेच नत्र स्थिर करण्याऱ्या व स्फुरद विरघळविणाऱ्या जिवाणू खतांचा ५ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणात आळवणीद्वारे वापर करावा. ॲसिटोबॅक्टर किंवा प्लान्ट हेल्थ जिवाणू खतांचा ५ मिलि प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणीद्वारे वापर करावा.- डॉ. गणेश कोटगिरे ९९६०८ ३३३०१- रमेश गायकवाड ९८८१३ २७३५५(कृषिशास्त्र व तंत्रज्ञान विभाग, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी (बु), जि. पुणे).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.