Pune APMC  Agrowon
ॲग्रो विशेष

Pune APMC : बाजार समितीत एकीकडे स्वच्छता मोहीम, दुसरीकडे कचऱ्याचे साम्राज्य

APMC Update : यानिमित्ताने पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संचालक मंडळ आणि प्रशासनाने स्वच्छता अभियानासाठी नवे कोरे खराटे आणून काही वेळ झाडण्याचे फोटो सेशन केले.

Team Agrowon

Pune News : महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या निमित्ताने देशात स्वच्छता पंधरवडा साजरा केला जात आहे. यानिमित्ताने पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संचालक मंडळ आणि प्रशासनाने स्वच्छता अभियानासाठी नवे कोरे खराटे आणून काही वेळ झाडण्याचे फोटो सेशन केले.

मात्र दुसरीकडे संपूर्ण बाजार आवारात कचऱ्याचे ढीग आणि मोकाट जनावरांचा सुळसुळाट होता. मोकाट जनावरांचा जथ्था मुख्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यावर बाजार समितीच्या संचालकांच्या गाळ्यासमोरच ठाण मांडून होता. या मोकाट जनावरांमुळे अडते मेटाकुटीला आले आहेत.

पुणे बाजार समितीमध्ये कचऱ्याची समस्या वाढत आहेत. नियमित होणारी स्वच्छतादेखील व्यवस्थित होत नसल्याच्या तक्रारी आडत्यांकडून केल्या जात आहेत. त्यातच आता मोकाट जनावरांचा देखील त्रास वाढला असून, मोठ्या प्रमाणावर मोकाट जनावरे बाजार आवरात फिरत असून, ते फळे आणि भाजीपाल्याचे नुकसान करत आहेत.

याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. एकीकडे मोठ्या प्रमाणावर सुरक्षा रक्षाकांची नियुक्ती केली आहे. मात्र अनेक सुरक्षारक्षक प्रत्यक्ष कामावर हजर नसल्याचे चित्र आहे. यामुळे विविध प्रवेशद्वारांमधून मोकाट जनावरे बाजार आवारात फिरत असल्याचे चित्र आहे.

दरम्यान, रविवारी (ता. १) स्वच्छता पंधरवड्यानिमित्त सर्वत्र ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान राबविण्यात येत असताना, बाजार समितीने देखील या अभियानांतर्गत स्वच्छतेसाठी ‘एक तारीख एक तास’ या मोहिमेअंतर्गत बाजार आवारातील स्वच्छता करण्याचा कार्यक्रम हाती घेतला होता. यासाठी नवेकोरे खराटे आणून केवळ फोटो सेशन पुरते खराटे मारण्यात आले.

या वेळी सभापती दिलीप काळभोर, उपसभापती रवींद्र कंद, सचिव डॉ. राजाराम धोंडकर, संचालक गणेश घुले, अनिरुद्ध भोसले अधिकारी, कर्मचारी, अडते, व्यापारी, शेतकरी, हमाल, तोलणार, कामगार व विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT