Pune APMC : शेतकरी बाजार घटकांना मूलभूत सुविधा पुरवाव्यात

Maharashtra APMC Update : रंगरंगोटी, कार्यालय नूतनीकरण, बांधकामांचा वाढीव खर्च, यावर कोट्यवधी रुपये खर्च करण्यापेक्षा शेतकरी बाजार घटकांना मूलभूत सुविधा पुरविण्यात याव्यात, असा सूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत उमटला.
Pune APMC
Pune APMC Agrowon

Pune News : रंगरंगोटी, कार्यालय नूतनीकरण, बांधकामांचा वाढीव खर्च, यावर कोट्यवधी रुपये खर्च करण्यापेक्षा शेतकरी बाजार घटकांना मूलभूत सुविधा पुरविण्यात याव्यात, असा सूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत उमटला. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीनंतर संचालक मंडळाने बुधवारी (ता. २७) घेतलेल्या पहिल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बाजार समितीच्या खर्चावर बोट ठेवण्यात आले.

वार्षिक सर्वसाधारण सभेला सभापती दिलीप काळभोर, उपसभापती रवींद्र कंद, जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप, सचिव डॉ. राजाराम धोंडकर, जिल्हा बँकेचे संचालक विकास दांगट, प्रवीण शिंदे, प्रदीप कंद, संचालक गणेश घुले, प्रकाश जगताप, सुदर्शन चौधरी, नितीन दांगट, नानासाहेब आबनावे, शशिकांत गायकवाड, मनीषा हरपळे, सारिका हरगुडे, बापू भोसले, संतोष नांगरे, शेतकरी संघटनेचे विठ्ठल पवार यांच्यासह कामगार, तोलणार, शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Pune APMC
Pune APMC : पुणे बाजार समितीमध्ये मासळी बाजाराचा घाट

आतापर्यंत झालेला खर्च आणि प्रस्तावित खर्चाचे अंदाजपत्रक सचिवांनी वाचून दाखविले. फुलबाजार बांधणीसाठी सुरुवातीच्या काळात अंदाजे ५४ कोटी रुपयांचा खर्च होणार होता. परंतु कामाची संथ गती आणि त्यातील बदलामुळे हा खर्च १२० कोटींवर जाऊन पोहोचला.

तसेच केळी बाजार रंगरंगोटी, मुख्य कार्यालय नूतनीकरणासाठी कोट्यवधी खर्च आणि मांजरी उपबाजारातील पिण्याच्या पाण्याचा अभाव, मार्केट यार्डातील स्वच्छतागृहाची दुरवस्था अशा विविध समस्या शेतकरी, मतदार, व्यापाऱ्यांनी मांडल्या.

Pune APMC
Pune APMC : कृषी बाजार समितीमधील मासळी बाजाराच्या विरोधात मोर्चा

व्यापारी घटकांनी नव्या फूलबाजारात प्रतीक्षा यादीत काळेबेरे असल्याची शंका उपस्थित करून यात लक्ष घालण्याची मागणी केली. याबरोबरच विविध नवीन योजना आणण्याची देखील मागणी केली.

शेतकऱ्यांना पुढे करून मासळी बाजाराचा घाट

बाजार समिती आवारात होणाऱ्या मासळी बाजाराला विविध अडते आणि व्यापारी संघटनांनी केलेल्या विरोधानंतर आता बाजार समितीच्या संचालक मंडळाने काही शेतकऱ्यांना हाताशी धरून मासळी बाजाराची मागणी करण्याचा घाट घातला आहे.

पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी शेततळी झालेली आहेत. या शेततळ्यात शेतकरी मत्स्यपालन करत असून, त्या ठिकाणी उत्पादित होणाऱ्या मासळीसाठी पुणे बाजार समितीमध्ये मासळी बाजार सुरू करण्यात यावा, अशी मागणी करण्यासाठी काही शेतकऱ्यांना बोलविण्यात आले असल्याची चर्चा रंगली. या शेतकऱ्यांचे बोलवते धनी कोण, याबाबत ही चर्चा सभेनंतर सुरू होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com