Pune APMC : पुणे बाजार समितीमध्ये अतिक्रमणांचा सुळसुळाट

Bazar samiti : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संचालक मंडळ नियुक्त झाल्यापासून अतिक्रमणांचा सुळसुळाट झाला आहे. या अतिक्रमणांकडे प्रशासनाने मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे.
Pune APMC
Pune APMC Agrowon
Published on
Updated on

Pune News : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संचालक मंडळ नियुक्त झाल्यापासून अतिक्रमणांचा सुळसुळाट झाला आहे. काही अडत्यांनी ‘असंतोषी’ संचालकांना हाताशी धरून गाळे दुरुस्तीच्या नावाखाली मजले आणि शेड उभारणी सुरू केली आहे. कर्नाटक आंबा विक्रीसाठी असणाऱ्या जागेवर डाळिंब यार्डाच्या नावाखाली भूखंड गिळंकृत करण्याचा काही अडते आणि काही संचालकांचा डाव असल्याचे समोर येत आहे. या अतिक्रमणांकडे प्रशासनाने मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे.

Pune APMC
Pune APMC : अडत्यांपुढे बाजार समिती हतबल; प्रतिज्ञापत्राच्या आदेशाला केराची टोपली

‘पुणे बाजार समितीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी अतिक्रमणे केली आहेत. प्रशासकीय काळामध्ये या अतिक्रमणांवर टाच आणण्याचा प्रयत्न झाला. मात्र प्रशासकीय राजवट संपून संचालक मंडळाची नियुक्ती झाल्यानंतर अतिक्रमणे करणाऱ्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. यामध्ये भुसार विभागात फरशी टाकणे, किरकोळ दुरुस्तीच्या नावाखाली अनधिकृत शेड उभारणे, मजला वाढविणेअसे सर्रास प्रकार सुरू आहेत. ही कामे करण्यासाठी एका संचालकाने पुढाकार घेतला आहे.

Pune APMC
Pune APMC : पुणे बाजार समितीमध्ये ठेकेदारांचा सुळसुळाट

भुसार विभागातील विविध कामांबरोबरच आता डाळिंब यार्ड उभारण्यासाठी देखील ‘अर्थ’ पूर्ण व्यवहार सुरू असल्याची चर्चा बाजार आवारात सुरू झाली आहे. मागील प्रशासकीय काळात शिवनेरी रस्त्यावरील भूखंड डाळिंबाचा व्यवसाय न करणाऱ्या व्यापाऱ्यांना डाळिंब यार्डाच्या नावाखाली देण्याची प्रक्रिया राबविण्यात आली होती. मात्र हे प्रकरण प्रसारमाध्यमांनी उघड केल्यावर पणन संचालकांनी याप्रकरणी तत्कालीन प्रशासकांची चौकशी सुरू केली होती. यामुळे हे प्रकरण मागे पडले होते. आता पुन्हा या डाळिंब यार्डाने डोके वर काढले असून, कर्नाटक आंबा विक्रीसाठी असणाऱ्या जागेवर डाळिंब यार्डाच्या नावाखाली जागेवर ताबा मारून भूखंड गिळंकृत करण्याचा काही अडते आणि संचालकांचा डाव असल्याचे समोर येत आहे.

‘अर्थ’पूर्ण व्यवहारातून कामे सुरू

बाजार समितीच्या संचालकांनी आपले एजंट बाजारात आवारात ठेवले आहेत. हे एंजट बाजार आवारात फिरून, कोणाची काय कामे सुरू आहेत किंवा करायची आहेत, याची माहिती संचालकांना देतात. आणि मग संचालक ‘अर्थ’पूर्ण व्यवहारातून कामे सुरू करत असल्याचे प्रकार सुरू आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com