Gokul Milk Rate agrowon
ॲग्रो विशेष

Gokul Milk Rate : दूध खरेदी दर कपातीवरून गोकुळ विरोधात शेतकऱ्यांचा आक्रमक पावित्रा कायम, शिरोळचे चिलींग सेंटर पाडले बंद

Andolan Ankush Sanghtana : कोण म्हणतंय देत नाही अशा जोरदार घोषणा देत आंदोलन अंकुशच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

sandeep Shirguppe

Kolhapur Jilha Milk Sangh : कोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ)ने मागच्या महिन्यात गाय दूध खरेदी दरात दोन रुपयांनी कपात केली. दरम्यान गोकुळ विरोधात हे दर पूर्ववत करावे यासाठी सतत आंदोलने सुरू आहेत. मागच्या दोन दिवसांपूर्वी गोकुळच्या बोरवडे शितकेंद्रात मनसेने तोडफोड केल्याची प्रकरण ताजे असताना याच मागणीसाठी आज(ता.१६) आंदोलन अंकुश संघटनेने उदगाव येथील गोकुळचे चिलिंग सेंटर बंद पाडले.

गोकुळ विरोधात आंदोलन अंकुशचे कार्यकर्ते एकत्र येत या सेंटरकडे जाणारी वाहने रोखून धरली. दूध दरवाढ झालीच पाहिजे, कोण म्हणतंय देत नाही, दरवाढ आमच्या हक्काची अशा जोरदार घोषणा देत आंदोलन अंकुशच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. घटनास्थळी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

https://whatsapp.com/channel/0029Va6bBAMI1rckFSh9s61r

गोकुळ दूध संघाने गाय दूध दर कपात मागे घेऊन दर पूर्ववत करावे, या मागणीसाठी शिरोळ तालुक्यातील उदगाव येथील चिलिंग सेंटर आज आंदोलन अंकुश संघटनेने बंद पाडले. दुधाची वाहतूक करणारी वाहने अडवली. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्याने काही काळ वातावरण तणावाचे बनले होते.

सरकार म्हणतंय गाईच्या दुधाला प्रतिलिटर कमीत कमी ३४ रुपये दर द्यावा लागेल. पण सरकार मध्ये असलेले व गोकुळचे नेते पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना आपल्याच सरकारचा निर्णय पाळावा असा वाटत नाही. दुध उत्पादकांनी या दरात गाई पाळायला परवडत नाही. यासाठी हे आंदोलन हाती घेतले आहे असे अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे म्हणाले म्हणाले.

मनसेकडून जोरदार आंदोलन

गायीच्या दूध दरात कपात केल्याच्या कारणावरून ‘मनसे’ कार्यकर्त्यांनी कागल तालुक्यातील बिद्री-बोरवडे दूध शितकरणात घुसून पोलिसांच्या उपस्थित कार्यालयाच्या काचा फोडल्या. यामध्ये ‘गोकुळ’ चे तीन ते चार अधिकारी खिडक्यांच्या काचा लागल्याने जखमी झाले. याबाबत मुरगूड पोलिसात गुन्हा नोंद झाला असून, आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान घटनास्थळी जोरदार घोषणाबाजीही देण्यात आली.

चर्चा सुरु असताना गाय दूध दरवाढ मिळालीच पाहिजे. अशी मागणी करीत कार्यकर्त्यांनी हातात असलेल्या झेंड्याच्या काठ्यांनी तोडफोड करण्यास सुरुवात केली. यामध्ये कार्यालयाच्या खिडकीच्या काचा, टेबलावरची काच, संगणकाची मोडतोड केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सरकीचा भाव तेजीत; कापूस टिकून, सोयाबीनमध्ये चढ उतार, खरबूजाला उठाव तर टोमॅटो आवक टिकून

Orchards Rain Damages: पावसाचा फळबागांचा फटका

khandesh Water Storage: मध्यम, लघु प्रकल्पांत जलसाठा ५० टक्क्यांपर्यंत

Maharashtra Rain Prediction: पूर्व विदर्भात ५ दिवस पावसाचा अंदाज; उद्यापासून राज्यात पावसाचे वातावणर निवळण्याची शक्यता

Unseasonal Rain Crisis: वादळी पावसाचा तिसऱ्यांदा तडाखा

SCROLL FOR NEXT