Mosaic virus : सोयाबीन पाठोपाठ पपई पिकावरही मोझॅकचा अटॅक

Yello Mosaic virus : सोयाबीननंतर मोझॅक वायरसने सोयाबीन पाठोपाठ पपई पिकावरही प्रादुर्भाव झाले आहे. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील ३ हजार हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रावरील पपई बागांचे नुकसान झाले आहेत.
Yello Mosaic virus
Yello Mosaic virusAgrowon
Published on
Updated on

Nandurbar News : राज्यातमाॅन्सूनच्या पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगाम वाया गेला. तर काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे ‘येलो मोझॅक व्हायरस’मुळे सोयाबीन पीक वाया गेले. त्यामुळे शेतकरी हैराण झाले असून सोयाबीननंतर आता पपईची वाट झाली आहे. नंदूरबार जिल्ह्यातील ३ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पपई बागांवर मोझॅकचा अटॅक झाला आहे. त्यामुळे पपई उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत.

Yello Mosaic virus
Sugarcane FRP Raju Shetti : राजू शेट्टींची आक्रोश पदयात्रा उद्यापासून, शेतकऱ्यांची ताकद दाखवण्यासाठी साखर कारखानदारांच्या दारात

खरीप हंगामातील सोयाबीन हे महत्वाचे पीक आहे. राज्यात सर्वच जिल्ह्यांमध्ये सोयाबीनचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. सष्टेबर महिन्यात विदर्भातील सोयाबीन पिकावरच ऐन शेंगभरणीच्या काळात मोझॅकचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे झाडे पिवळी पडल्याने सोयाबीनच्या उत्पादन मोठी घट झाली होती.

गेल्या काही वर्षांपासून पपई उत्पादकांना वेगवेगळ्या संकटाचा सामना करावे लागत आहेत. त्यात आता पपईवर येलो मोझॅकच्या आक्रमणामुळे पुन्हा संकटात सापडले आहे. या कीडीमुळे पपईच्या उत्पन्नात मोठी घट होण्याची भीती व्यक्त होत आहे. या व्हासरसने केवळ विदर्भात नव्हे तर मध्य प्रदेश आणि तेलंगणातील पपई पिकालाही मोठा फटका बसला आहे. या तीन राज्यांत वातावरणात निर्माण झालेल्या उष्ण आणि दमट वातावरणाने पपईवर हा व्हायरस झाल्याचे कृषी तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

शासनाने सोयाबीन उत्पादकांना मोझॅक व्हायरसमुळे नुकसानीची मदत देण्याचं आश्वासन दिलं होतं. त्याचप्रमाणे पपई उत्पादक शेतकऱ्यांनाही सरकारनं मदत करावी अशी अपेक्षा आता व्यक्त केली जात आहे.

Yello Mosaic virus
Soybean Yellow Mosaic Disease : सोयाबीनवर यलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव, शेतकरी हतबल

पिवळा मोझॅक रोगाची लक्षणे काय आहेत?

पिवळा मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास पपईच्या पानाच्या मुख्य शिरांजवळ पिवळ्या रंगाचे चट्टे दिसतात. हे पिवळ्या रंगाचे चट्टे विखुरलेल्या अवस्थेत दिसतात. पपईची पाने जशी वाढत जातात तसे त्यावर तांबूस रंगाचे चट्टे दिसू लागतात. काही वेळा जास्त प्रादुर्भाव असल्यास पाने अरुंद होतात आणि कोमजतात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com