Gokul Cow Milk Rate : गाय दूध दर कपातीवरून मनसेचे कोल्हापुरात खळखट्याक, गोकुळ कार्यालय फोडले

Kolhapur Gokul Milk : ‘गोकुळ’ चे तीन ते चार अधिकारी खिडक्यांच्या काचा लागल्याने जखमी झाले. याबाबत मूरगूड पोलिसात गुन्हा नोंद झाला.
Gokul Cow Milk Rate
Gokul Cow Milk Rateagrowon
Published on
Updated on

Gokul Milk Rate : मागच्या काही दिवसांपूर्वी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) संघाकडून गाय दूध खरेदी दरात कपात करण्यात आली. यावरून कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक दूध उत्पादकांनी गोकुळवर मोर्चा काढला होता. दरम्यान गायीच्या दूध दरात कपात केल्याच्या कारणावरून ‘मनसे’च्या कार्यकर्त्यांनी कागल तालुक्यातील बिद्री-बोरवडे दूध शितकरणात घूसून पोलिसांच्या उपस्थित कार्यालयाची काच्या फोडल्या केली.

यामध्ये ‘गोकुळ’ चे तीन ते चार अधिकारी खिडक्यांच्या काचा लागल्याने जखमी झाले. याबाबत मूरगूड पोलिसात गुन्हा नोंद झाला असून, आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान घटनास्थळी जोरदार घोषणाबाजीही देण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, चार दिवसांपूर्वी ‘गोकुळ’ ने गाय दूध दरवाढ करावी. असे निवेदन ‘मनसे’ चे जिल्हाध्यक्ष युवराज येडूरे व कार्यकर्त्यांनी ‘गोकुळ’ प्रशासनाला दिले होते. आज (ता.१४) सकाळी ‘मनसे’ चे कार्यकर्त्यांनी ‘गोकुळ’ च्या बिद्री-बोरवडे शितकरण केंद्राच्या गेटवर आंदोलन करून घोषणाबाजी केली. पोलीसांनी याबाबत चार ते पाच प्रमुख कार्यकर्त्यांना आत बोलावून चर्चेसाठी शितकरण केंद्र प्रमुख विजय कदम यांच्या कार्यालयात चर्चेसाठी बोलावले.

चर्चा सुरु असताना गाय दूध दरवाढ मिळालीच पाहिजे. अशी मागणी करीत कार्यकर्त्यांनी हातात असलेल्या झेंड्याच्या काठ्यांनी तोडफोड करण्यास सुरुवात केली. यामध्ये कार्यालयाच्या खिडकीच्या काचा, टेबलावरची काच, संगणकाची मोडतोड केली. त्याच्या काचा अंगावर आल्याने तीन ते चार कर्मचारी जखमी झाले.

पोलीसांच्या उपस्थित झालेली तोडफोड याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. मुरगूड पोलीसात याबाबत फिर्याद दाखल झाली असून, आंदोलकांना ताब्यात घेवून गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे.

Gokul Cow Milk Rate
Gokul Milk : गोकुळच्या सत्ताधाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाचा धक्का, जुन्या कंत्राटदारांना दिलासा

कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक चांगल्या प्रतीच्या दुधाचा पुरवठा करूनही दूध उत्पादकांची 'गोकुळ'कडून काळजी घेतली जात नाही. त्यात गाय दुधाचा दर कमी करून उत्पादकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम सुरू असल्याचाही आरोप करण्यात आला होता. त्यामुळे गायीच्या दुधाची खरेदी दरवाढ करा, अन्यथा 'अमूल'सारखे पर्याय खुले असल्याचा इशारा देण्यात आला होता.

गोकुळकडून वीस लाख लिटर दूध संकलनाचे उद्दिष्ट्य आहे. यामध्ये गाय दूधाचे संकलनही महत्त्वाचे आहे. एकीकडे तरुणांनी दूध उत्पादन व्यवसाय करावा यासाठी शासनासह लोकप्रतिनिधींकडून आवाहन केले जात आहे. तर दुसरीकडे दरात कपात झाल्यामुळे त्यांच्या उत्साहावर पाणी फेरले जात आहे. गायीसाठी चारा, औषधपाणी यासह इतर खर्च करताना मेटाकुटीला आलेल्या उत्पादकाला दर कपातीचा धक्का सहन होणार नसल्याने असे प्रकार घडत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com