Chilli Agrowon
ॲग्रो विशेष

Chilli Cultivation : विक्रमगडमध्ये मिरची लागवड वाढली

Chilli Production : विक्रमगड तालुक्यात काही शेतकरी या जागेवर मोठ्या प्रमाणात मिरची उत्पादन घेऊ लागले आहेत.

Team Agrowon

Vikramgad News : विक्रमगड तालुक्यात खरीप हंगामात भातपिकाची मोठ्या प्रमाणात लागवड होते. मात्र रब्बी हंगामात सिंचन क्षेत्र वगळता फारशी पिके घेतली जात नाहीत. विक्रमगड तालुक्यातील कुंर्झे गावाच्या आजूबाजूला डोंगर-दऱ्या असल्याने या गावाला सौंदर्य प्राप्त झाले आहे.

नदी जवळच असल्या कारणाने पाण्याची उपलब्धता असतानाही गावाभोवती पडीक जागेचे प्रमाण अधिक आहे. मात्र काही शेतकरी या जागेवर मोठ्या प्रमाणात मिरची उत्पादन घेऊ लागले आहेत.

तालुक्यात ओलिताखाली क्षेत्र फारसे नसल्याने दुबार आणि तिबार शेती केली जात नाही. त्यामुळे शेतीतून फारसे उत्पन्न मिळत नसल्याची शेतकऱ्यांकडून ओरड होताना पाहायला मिळते. मात्र गेल्या काही वर्षांत ही परिस्थिती बदलण्यास सुरुवात झाली आहे.

भात कापणीनंतर जमिनीतील ओलावा दोन महिने टिकत असल्याने शेतकऱ्यांनी वाल, पावटे, हरभरा, तूर यांसारख्या पिकांची लागवड करण्यास सुरुवात केली आहे. त्यात भर म्हणजे रब्बी हंगामात तालुक्यात भाजीपाला लागवड मोठ्या प्रमाणात होऊ लागली असून काही शेतकरी यातून लाखो रुपये कमवत आहेत. त्यामुळे तालुक्यातील शेतीचे अर्थकारण बदलण्यास सुरुवात झाली आहे.

साधारण अडीच महिन्यांपूर्वी मध्यम प्रतीच्या दोन एकर जमिनीत वाफे पद्धतीने मिरचीच्या रोपांची लागवड करून पाण्याचे नियोजन केले. सध्या उन्हाळा असल्या कारणाने दोन दिवसांतून पाणी द्यावे लागते. दीड महिन्याच्या कालावधीनंतर मिरचीचे उत्पन्न सुरू झाले.

सेंद्रिय पद्धतीने लागवड

नियमित आणि आवश्यक तितकेच पाणी दिल्याने रोपांची मुळे जमिनीत व्यवस्थित स्थिर होऊन पीक जोमात वाढले. अडीच महिन्यांच्या कालखंडात रोगमुक्त औषधांचा मात्रा दिल्याने पिकाची रोगराईपासून मुक्ती होण्यास मदत झाली.

त्यातच कंपोस्ट आणि शेणखताचा अधिक वापर केल्याने परिणामी मिरच्यांच्या झाडाला रोगमुक्त फुले येऊन झाडाला फळ आले. पिकाला बाजारात प्रतिकिलोला ६० ते ६५ रुपये असा उच्चांकी भाव प्राप्त होत असल्याने पीक उत्पादनासाठी केलेल्या कष्टाचे चीज होत आहे, असे कुंर्झे परिसरातील शेतकऱ्यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT