Red Chilli : लाल मिरचीच्या दरात घट

Chilli Market : सुक्या मसाल्यासाठी वापरण्यात येणाऱ्या लाल मिरचीचे दर घाऊक बाजारात ४०० ते ५०० रुपये किलो झाले होते.
Chilli
Chilli Agrowon
Published on
Updated on

Vashi News : उन्हाळा सुरू झाला की महिला मसाला तयार करण्याच्या तयारीला लागतात. यंदा दिवाळीपासूनच लाल मिरचीचा ठसका वाढला होता. सुक्या मसाल्यासाठी वापरण्यात येणाऱ्या लाल मिरचीचे दर घाऊक बाजारात ४०० ते ५०० रुपये किलो झाले होते.

मात्र, किलोमागे आता हे दर ५० रुपयांनी कमी झाले आहेत. त्यामुळे घाऊक बाजारात लाल मिरचीचा ठसका उतरणीला लागला आहे. वाशीतील घाऊक मसाला बाजारात सध्या लाल मसाल्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मिरच्यांची आवक वाढली आहे. सध्या १४ ते १५ गाड्या मिरच्यांची दररोज घाऊक बाजारात आवक होत आहे.

Chilli
Chilli Crop : डहाणूत मिरची बागायतदार संकटात

हळूहळू या गाड्यांची संख्या वाढू लागली आहे. मुख्य हंगामात ८० ते ९० गाड्या दाखल होतात. एका गाडीत चार ते पाच हजार गोणी मिरच्या असतात. मिरच्यांच्या गोणीचे वजन ३० ते ३५ किलो असते. फेब्रुवारी ते मार्च हा बाजारात मिरच्या येण्याचा मुख्य महिना असतो. त्यामुळे या काळात बाजारात लाल मिरच्यांचा ठसका लागतो.

Chilli
Chilli Crop Farming : दुष्काळाचे आव्हान समजले; मिरची पीक यशस्वी केले

अवकाळी पावसामुळे नुकसान

गेल्या वर्षी अवकाळी पावसामुळे मिरचीच्या पिकाला मोठा फटका बसला होता. त्यातच अनेक ठिकाणी गोदामात असलेली लाल मिरचीही पाण्याखाली गेल्याने मोठे नुकसान झाले होते. तेव्हापासून बाजारात लाल मिरचीचे दर वाढण्यास सुरुवात झाली होती.

या महिन्यात आवक वाढल्याने मिरचीचे दर कमी होत आहेत. घाऊक बाजारात लाल मिरचीच्या दरात किलोमागे ५० ते १०० रुपयांची घट झाली आहे. घाऊकमध्ये दर उतरल्याने किरकोळ बाजारातही दर उतरणीला लागले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com