Cloudy Weather Agrowon
ॲग्रो विशेष

Cold Weather Update : जळगावात थंडीचा कडाका ढगाळ वातावरणामुळे कमी

Weather News : शहरासह जिल्ह्यात आज रविवारी (ता.१२) सकाळपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झालेले होते. काही ठिकाणी पावसाचे ढग भरून आलेले होते.

Team Agrowon

Jalgaon News : शहरासह जिल्ह्यात आज रविवारी (ता.१२) सकाळपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झालेले होते. काही ठिकाणी पावसाचे ढग भरून आलेले होते. हलकासा पाऊससरीही काडी ठिकाणी कोसळल्या.

गेल्या आठवड्यात थंडीचा कडाका वाढलेला होता. तो आजच्या ढगाळ वातावरणाने काहीसा कमी झालेला दिसून आला. शहरासह जिल्ह्यात आज हवी तशी थंडी नव्हती मात्र, दिवसभर ढगाळ वातावरण व गारवा होता.

येत्या १४ जानेवारीला मकरसंक्रांती आहे. यादिवशी थंडी राहते. नंतर दिवस तिळा एवढा मोठ-मोठा होत जातो. अन्‌ तापमानही वाढत जाते, असे जुने जाणकार सांगतात. अजून किती दिवस ढगाळ वातावरण राहते, त्यावर थंडी अवलंबून राहणार आहे. मात्र, हा थंडीचा शेवटचा महिना असल्याने कधी थंडी, तर कधी ढगाळ वातावरण असा खेळ सुरू राहील, असे हवामान अभ्यासक सांगतात.

गेल्या सप्ताहात संमिश्र तापमानाचा अनुभव जळगाव जिल्हावासीयांना आलेला आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला ढगाळ वातावरणानंतर तब्बल आठ ते नऊ अंशांपर्यंत तापमानात घट झालेली होती. दोन तीन दिवस आल्हाददायक वातावरण दिसून येत होते.

अचानक गेल्या शुक्रवारी (ता.१०) सकाळी ढगाळी वातावरण निर्माण झालेले होते. मात्र, लख्ख ऊन पडले. शनिवारी (ता.११) दिवसभर ढगाळ वातावरण दिसून आले आणि किमान तापमान ११ अन्‌ क.मा. २६ अंशांवर होते.

आर्द्रतादेखील ६५ टक्केच्या दरम्यान असल्याने दमट हवामानासह ढगाळ वातावरण दिसून येत होते. सूर्याची मकरवृत्ताकडे वाटचाल सुरू झालेली आहे. आगामी काळात तापमानात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.

आंब्यावर परिणाम

ढगाळ वातावरणामुळे आंब्याच्या झाडांवर आलेला मोहोर गळून पडण्याची भीती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आहे. बहुतांश सर्वच आंब्यांच्या झाडांना सध्या मोहोर आलेला दिसून येत आहे. त्यातच आता ढगाळ वातावरण, अतिवाऱ्यामुळे आंब्यांचे नुकसान होईल.

गेल्या काही दिवसांतील तापमान

तारीख किमान कमाल

६ जानेवारी ९ २६

७ जानेवारी ८ २७

१० जानेवारी ९ २५

११ जानेवारी १० २७

११ जानेवारी ११ २७

१२ जानेवारी १२ २४

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Diwali Article: माचीवरला शंकर...

Saptashrungi Devi Darshan: सप्तशृंगीमातेचे मध्यरात्रीपर्यंत मिळणार दर्शन

Model Village: भेंड गावानं बांधलं प्रगतीचं, विकासाचं तोरण !

Agrowon Diwali Article: अवघाचि संसार सुखाचा करीन

NITI Aayog: देशातील समुद्री मासेमारीच्या विकासासाठी नीती आयोगाचा अहवाल; स्वतंत्र योजना आणि धोरणांची शिफारस

SCROLL FOR NEXT