Joyful Farming : आपल्याकडे शेतकरी म्हणजे कायम पिचलेला, कर्जाच्या ओझ्याने वाकलेला, उद्ध्वस्त वावराकडे हताशपणे पाहणारा, शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेणारा आणि धान्य खळ्यावरून सरळ बाजारात नेणारा असे चित्र दिसते. शेतात रासायनिक खते, कीटकनाशके चढाओढीने टाकणारे आमचे शेतकरी आनंदाला दूर ढकलत कायम दुःखाला कवटाळत बसतात. .नांदेडमधील एका शेतकऱ्याला मी त्याचा ताणतणाव दूर करण्यासाठी मध्य प्रदेशामधील यादव यांची शेती पाहण्यास सांगितले. ‘‘सर्व खर्च माझा. तू फक्त तेथे दोन दिवस जाऊन राहा,” एवढीच विनंती केली. त्यावर त्याचे उत्तर होते, “साहेब, ज्यांचे पोट भरलेले असते तेच अशी आनंदाची शेती करू शकतात. ज्याचे पोट आधीच खपाटीला गेले आहे तेथे असा आनंद काय कामाचा?” त्याचे म्हणणे बरोबर होते..Organic Farming: सेंद्रिय शेतीविषयी आफ्रिकेत सादरीकरण.आनंदी शेती कशी असावी हे मला माझ्या आजोळी आजोबांनी शिकविले. आनंदाच्या शिदोरीचे ते खरे गुरू. त्या वेळी पाऊस नियमित पडत असे. वाफसा झाला की पेरणीची लगबग. तूर, उडीद, मूग, भुईमूग, मका ही त्या वेळची खरिपाची पिके. पेरणीच्या आधी आजोबा घरामधील एक मोठी परात घेऊन शेतात येत आणि त्यात जे धान्य पेरावयाचे ते एकत्र मिसळून बांधावरच्या दोन मोठ्या झाडांच्या मध्ये ठेवत. हे पक्ष्यांसाठी असे. सायंकाळी पेरणी पूर्ण होईपर्यंत परात रिकामी झालेली असे..आजोबा म्हणत, की धान्यावर पहिला अधिकार पक्ष्यांचा आहे. त्यांना अन्न दिले तरच ते माझ्या शेताचे किडीपासून रक्षण करतील. शेतातील भुईमुगास केवढ्या तरी शेंगा लागत. उपटलेला वेल शेतालगतच्या वाहत्या नदीच्या पाण्यात धुऊन मला देत. प्रेमाने उपटलेल्या त्या वेलाची एकही शेंग मातीत राहत नसे. आजोबा वेलावरच्या लहान चिंगळ्या (कोवळी बी विरहित शेंग) डोहाच्या पाण्यात टाकावयास सांगत कारण माशांसाठी ते अन्न होते. वेलास चिकटलेली माती नदीच्या वाहत्या पाण्यात स्वच्छ धुवावयास सांगत, कारण आपल्या शेतातील सुपीक माती गाळाच्या रूपाने दुसऱ्याच्या शेतात जावी..Organic Farming Success : प्रतिकूलतेतही नगदी पिकांचे दर्जेदार सेंद्रिय उत्पादन.आज वाहत्या नद्याही नाहीत आणि ज्यामध्ये नदीचा जीव असतो तो डोह सुद्धा नाही. खरीप, रब्बीचे धान्य खळ्यावर आले, की बारा बलुतेदारांना शेतावर येण्याचे आमंत्रण दिले जात असे. त्यांच्या बरोबर चटणी-भाकरीचा घास खात आजोबा त्यांच्या वाट्याचे धान्य त्यांना स्वत:च घ्यावयास सांगत..जेव्हा शेतकरी शेतीचे उत्पन्न पैशात मोजावयास सुरुवात करतो तेव्हा त्याची पावले नकळत सुख उपभोगण्याकडे वळतात. या प्रकारात शेतीमालाची पौष्टिकता दुर्लक्षित असते. सगळे लक्ष हातात उत्पन्न काय येते यावरच केंद्रित असते. ही शेती करताना आपल्या हातून कळत नकळत पर्यावरणाची हानी होत आहे, याकडे शेतकऱ्याचे लक्ष नसते..हव्यास हेच या शेतीचे मूळ आहे. ही शेती करणारे जैवविविधतेचा सांभाळ करत नाहीत. झाडाचा प्रत्येक आंबा आपलाच, असे हे धोरण असते. हरितगृहामधील शेती तर पूर्णपणे व्यावसायिक शेतीच. आतमध्ये कोणालाही प्रवेश नाही. सर्व उत्पादन निर्यातीसाठीच. जे शेतकरी सोयाबीन, कापूस या नगदी पिकांची शेती करतात, ते सुद्धा सुखी शेतीकडे वाटचाल करण्याचाच एक प्रकार आहे.(संपूर्ण लेख वाचा २०२५ च्या अॅग्रोवन दिवाळी अंकात)अंक खरेदीसाठी लिंक- https://shorturl.at/TJmdc.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.