NITI Aayog: देशातील समुद्री मासेमारीच्या विकासासाठी नीती आयोगाचा अहवाल; स्वतंत्र योजना आणि धोरणांची शिफारस
Deep Sea Fishing: नीती आयोगाने खोल समुद्रात आणि किनाऱ्यालगतच्या मासेमारीला प्रोत्साहन देण्यासाठी एक महत्त्वाचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात भारताच्या मासेमारी क्षेत्राला बळकट करण्यासाठी पुढील १५ वर्षांत सुमारे ९ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आणि विशेष योजना तयार करण्याची शिफारस केली आहे.